boAt Airdopes 141 TWS

boAt Airdopes 141 इयरबड्सची किंमत फक्त १,३९९ रुपये आहे. हे इयरबड्स ४२ तासांच्या प्लेबॅक टाइमसह येतात. तसेच, पाणी आणि घामापासून सुरक्षेसाठी या बड्सला आयपीएक्स४ रेटिंग देखील मिळाले आहे. अॅमेझॉनवरील लिस्टिंगनुसार, केवळ ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या बड्सला तुम्ही ७४ मिनिटं वापरू शकता. यामध्ये रियल टाइम ऑडिओ लो-लेटेंसीचा अनुभव मिळेल. तसेच, boAt Airdopes 141 इयरबड्समध्ये Environmental Noise Cancellation फीचर देखील दिले आहे.
Zebronics Zeb-Sound Bomb 1 TWS

Zebronics Zeb-Sound Bomb 1 TWS इयरबड्सला देखील तुम्ही १,५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. सिंगल चार्जमध्ये यात १२ तासांचा बॅकअप टाइम मिळतो. Zebronics च्या इयरबड्समध्ये टच कंट्रोल आणि वॉइस असिस्टेंट सारखे शानदार फीचर्स देखील दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, डिव्हाइस स्प्लॅश प्रूफ आहेत. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ वी५.० चा सपोर्ट दिला आहे. तसेच, वायरलेस स्टीरियो साउंड मिळतो. यामध्ये ६ एमएमचे ड्रायव्हर्स दिले आहेत.
pTron Bassbuds Tango ENC

pTron ला आपल्या स्वस्त प्रोडक्ट्ससाठी ओळखले जाते. pTron Bassbuds Tango ENC ला तुम्ही ई-कॉमर्स साइटवरून फक्त १,२९९ रुपयात खरेदी करू शकता. या बड्समध्ये चित्रपट पाहण्यासाठी एक वेगळा मोड दिला आहे. यामध्ये ४० तासांचा प्लेटाइम देखील मिळतो. सोबतच, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.१ चा सपोर्ट दिला आहे. यामध्ये टच सपोर्ट देखील दिला आहे. बड्समध्ये १३ एमएमचे ड्रायव्हर्स दिले आहेत. तसेच, सिंगल चार्जमध्ये ४० तासांचा प्ले टाइम मिळतो.
Noise Beads TWS

Noise Beads TWS ला तुम्ही फक्त १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. या बड्समध्ये टच कंट्रोल आणि हायपरसिंग टेक्नोलॉजीचा सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, बड्स कानात सहज फिट बसतात. सिंगल चार्जमध्ये ७ तासांचा प्लेटाइम आणि चार्जिंग केससोबत एकूण १८ तासांचा प्लेटाइम मिळतो. याशिवाय Hyper Sync technology द्वारे तुम्ही सहज मिनिटात डिव्हाइसशी कनेक्ट करू शकता. बड्सला IPX5 रेटिंग देखील मिळाले आहे.
Boult Audio AirBass Z1

Boult Audio AirBass Z1 बड्सला तुम्ही ई-कॉमर्स साइट्सवरून फक्त १,४९९ रुपयात खरेदी करू शकता. डिव्हाइस २४ तासांच्या प्ले टाइमसह येते. यामध्ये फास्ट चार्जिंग आणि टाइप सी पोर्ट देखील दिला आहे. यात टच कंट्रोलचा सपोर्ट मिळतो. तसेच, वॉइस असिस्टेंट फीचर देखील यामध्ये दिले आहे. वॉटर रेसिस्टेंटसाठी बड्सला IPX5 रेटिंग मिळाले आहे. तसेच, Monopod Feature द्वारे तुम्ही दोन बड्सचा वेगवेगळा वापर देखील करू शकता.
(नोट – डिव्हाइसच्या किंमतीत ऑफर आणि स्टॉकनुसार बदल होऊ शकतो.)
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times