जर तुम्ही प्रीपेड प्लान शोधत असाल जो भरपूर फायदे आणि खूप कमी खर्चासह येतो. तर BSNLचे काही भन्नाट प्लान्स तुमच्यासाठी बेस्ट ठरतील. या योजना कमी किमतीत अधिक फायदे देण्यासाठी ओळखल्या जातात. बीएसएनएलचे हे प्लान कॉलिंग आणि डेटा दोन्हीचा लाभ देतात. तुम्ही नियमित कॉलिंग करत असाल तरी देखील हे प्लान्स तुमच्यासाठी उत्तम आहे. तुमची गरज जर डेटाची असेल तरी देखील तुम्ही प्लान्स वापरू शकता. विशेष म्हणजे त्या प्लान्सच्या किमती देखील फार नाही. आज आम्ही येथे आम्ही BSNL कडून ऑफर करण्यात येणारे काही सुपर परवडणारे व्हॉईस कॉल व्हाउचर लिस्ट केले आहेत. जे तुमच्या बजेटमध्ये पूर्णपणे फिट बसतील. या प्लान्सशी संबंधित प्रत्येक तपशील सविस्तर जाणून घ्या आणि तुमच्या गरजेनुसार खरेदी करा BSNL चा बेस्ट प्लान.

​कमी किमतीत अनेक फायदे

कमी किमतीत अनेक फायदे : BSNL चा २९८ रुपयांचा प्लान ग्राहकांसाठी बेस्ट आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना अनेक जबरदस्त बेनिफिट्स मिळतात. BSNL च्या २९८ रुपयांच्या प्लानमध्ये ५६ दिवसांची वैधता मिळते. तसेच, यात तुम्हाला १०० SMS/दिवस मिळतील. तुम्हाला हवं तेवढा कॉल करण्यासाठी मोफत व्हॉईस कॉलची सुविधा देखील BSNL चा २९८ रुपयांचा प्लान उपलब्ध आहेत. डेटा युजर्ससाठी याप्लान मध्ये दररोज १ GB डेटा देण्यात येतो. तसेच, ५६ दिवसांसाठी EROS Now चे मोफत सबस्क्रिप्शन देखील या प्लानमध्ये दिले जाते.

५० जीबी पर्यंत डेटा

मिळणार ५० जीबी पर्यंत डेटा : BSNL चा Voice_187 पॅक, २८ दिवसांच्या वैधतेसाठी येतो. या प्लानमध्ये कंपनी १०० SMS/दिवसासह देते. तसेच, यात मोफत व्हॉइस कॉलची सुविधा देखील तुम्हाला मिळेल. BSNL च्या STV_247 प्लॅनची किंमत २४७ रुपये आहे. ज्यात ३० दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी अमर्यादित व्हॉईस कॉल्ससह दररोज १०० एसएमएस ऑफर केले जातात. हा प्लान एकूण ५० GB डेटा देखील ऑफर करतो आणि BSNL Tunes आणि EROS Now चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करतो.

​अनलिमिटेड व्हॉइसकॉलसह अनेक सुविधा

अनलिमिटेड व्हॉइसकॉलसह अनेक सुविधा : BSNL च्या ११८ रुपयांच्या प्लानमध्ये २६ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल करतात येतात. यात दररोज ०.५ GB डेटा मिळतो. तर, दुसरीकडे, BSNL चा STV_147 पॅक, १४७ रुपयांमध्ये एकूण १० GB डेटा आणि ३० दिवसांच्या वैधतेसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि BSNL ट्यूनमध्ये प्रवेश प्रदान करतो. BSNL १८५ रुपयांमध्ये २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी १ GB डेटासह १०० SMS प्रतिदिन अनलिमिटेड व्हॉइस कॉल ऑफर करते. हा प्लान बीएसएनएल ट्यून्समध्ये प्रवेश देखील प्रदान करतो.

​प्लान्स खूपच स्वस्त

प्लान्स खूपच स्वस्त : BSN च्या यादीतील दोन प्लान खूपच स्वस्त आहेत. BSNL केवळ ४९ रुपयांमध्ये २४ दिवसांच्या वैधतेसाठी एकूण २ GB डेटासह १०० मिनिटे मोफत व्हॉइस कॉल ऑफर करत आहे. बीएसएनएलचा आणखी एक स्वस्त प्लान आहे जो खूप लोकप्रिय आहे. हा प्लान ९९ रुपयांचा आहे जो २२ दिवसांच्या वैधतेसाठी येतो आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल ऑफर करतो. BSNL चे एक व्हाउचर Voice_135 देखील आहे जे १३५ रुपयांमध्ये येते आणि २४ दिवसांच्या वैधतेसाठी १४४० मिनिटे व्हॉइस कॉल ऑफर करते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here