टेलिकॉम कंपनी Reliance Jio कडे प्रीपेड रिचार्ज प्लान्सची मोठी लिस्ट आहे. प्रतिस्पर्धी कंपन्या एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलच्या तुलनेत जिओ कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्लान्स सादर करत आहे. कंपनीकडे अगदी १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर फक्त कॉलिंगसाठी प्लान शोधत असाल तर कंपनी आपल्या बहुतांश प्लानमध्ये अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा देत आहे. तसेच, डेटा प्लान शोधत असाल तरीही कंपनीकडे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे प्लान्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर जास्त डेटा वापरत असाल तर कंपनीकडे दररोज ३ जीबी डेटा ऑफर करणारे काही चांगले प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्सची किंमत ४९९ रुपये, ६०१ रुपये, १,१९९ रुपये आणि ४,१९९ रुपये आहे. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​जिओचा ४१९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे ४१९ रुपयांच्या किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता २८ दिवस आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ८४ जीबी डेटा दिला जात आहे. याशिवाय देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळत आहे. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.

​जिओचा ६०१ रुपयांचा प्लान

रिलायन्स Jio च्या ६०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ६ जीबी डेटा मिळतो. अशाप्रकारे या प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा मिळेल. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची देखील सुविधा मिळते. प्लानमध्ये दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. तसेच, जिओ अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात १ वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

​जिओचा १,१९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ कडे १,१९९ रुपयांचा प्लान उपलब्ध असून, या प्लानची वैधता ८४ दिवस आहे. यूजर्सला ८४ दिवस दररोज ३ जीबी डेटा अशाप्रकारे एकूण २५२ जीबी डेटा मिळतो. तसेच, या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

​जिओचा ४,१९९ रुपयांचा प्लान

तुम्ही जर जास्त वैधतेसह येणारा प्लान शोधत असाल तर ४,१९९ रुपयांचा रिचार्ज तुमच्यासाठी बेस्ट आहे. जिओच्या ४,१९९ रुपयांच्या प्लानची वैधता १ वर्ष म्हणजे ३६५ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १०९५ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतील. यात जिओ अ‍ॅप्सचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here