टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत जास्त फायदे देणारे प्रीपेड प्लान्स ऑफर करत आहेत. खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea कडे देखील एकापेक्षा एक शानदार प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या कमी होत असली तरीही कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्लान्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देत आहे. कंपनीकडे २८ दिवसांची वैधता आणि ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक स्वस्त प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. Vodafone Idea या प्रीपेड प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएसह वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस, वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि डेटा डिलाइट्सची सुविधा मिळते. कंपनीकडे ३०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत १७९ रुपये, २६९ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये आणि ४७५ रुपयांचा प्लान आहे. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Vi चा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान

vi-

Vodafone Idea कडे १७९ रुपये किंमतीत येणारा सर्वात स्वस्त प्लान उपलब्ध आहे. हा या लिस्टमधील सर्वात स्वस्त प्लान आहे. १७९ रुपयांचा हा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जात आहे. याशिवाय प्लानमध्ये एकूण २ जीबी डेटा मिळतो. यात २८ दिवसांसाठी एकूण ३०० मोफत एसएमएस मिळतील. तसेच, वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा देखील मोफत अ‍ॅक्सेस कंपनी देत आहे.

​Vi चा २६९ रुपयांचा प्लान

vi-

Vodafone Idea कडे २६९ रुपयांच्या किंमतीत येणारा एक शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता देखील २८ दिवस आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा मिळेल. तसेच, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची देखील सुविधा मिळते. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यामध्ये वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस दिला आहे.

​Vi चा २९९ रुपयांचा प्रीपेड प्लान

vi-

Vi च्या २९९ रुपयांच्या प्लानमध्ये जबरदस्त बेनिफिट्स मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यात दररोज १.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि दरमहिन्याला २ जीबी बॅकअप डेटा मिळत आहे.

​Vi चा ३५९ रुपयांचा प्लान

vi-

Vodafone Idea च्या ३५९ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. तसेच, देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळत आहे. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि दरमहिन्याला २ जीबी बॅकअप डेटा मिळत आहे.

​Vi चा ४७५ रुपयांचा प्लान

vi-

कंपनीच्या ४७५ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळत आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळत आहे. या प्लानमध्ये अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. यात वीकेंड डेटा रोलओव्हर, बिंज ऑल नाइट आणि दरमहिन्याला २ जीबी बॅकअप डेटाची सुविधा मिळत आहे. याशिवाय, वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अ‍ॅक्सेस मिळतो. तुम्ही जर जास्त डेटा वापरत असाल तर हा प्लान फायद्याचा ठरेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here