OnePlus ने आपला स्वस्त स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G ला भारतीय बाजारात लाँच केले आहे. OnePlus Nord CE 2 5G मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९०० प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. याशिवाय या फोनमध्ये ६५ वॉट सुपर VOOC फास्ट चार्जिंग आणि ६४ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील मिळतो. या फोनची सुरुवाती किंमत २३,९९९ रुपये आहे. तुम्ही जर वनप्लसचा हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मात्र, त्याआधी याच बजेटमध्ये येणाऱ्या पर्यायी फोन्सविषयी देखील जाणून घेणे गरजेचे आहे. कमी किंमतीत येणारा OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात Realme 9 Pro+ 5G आणि Xiaomi 11i 5G या स्मार्टफोन्सला टक्कर देतो. या तिन्ही स्मार्टफोन्सच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

OnePlus Nord CE 2 5G देणार Realme, Xiaomi च्या ‘या’ दमदार स्मार्टफोन्सला टक्कर, पाहा कोणता हँडसेट आहे बेस्ट?
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times