Netflix, Disney + Hotstar, Sony Liv आणि Zee5 यासह इतर OTT प्लॅटफॉर्मवर जवळ- जवळ प्रत्येक आठवड्यात अनेक नवीन मालिका आणि चित्रपट प्रदर्शित केले जातात. जर तुम्हाला सतत नव-नवीन वेब सिरीज, चित्रपट आणि डॉक्युमेंट्रीज पाहण्याची आवड असेल, तर त्याची खरी मजा मस्त मोठ्या टीव्हीवर पाहण्यातच आहे. आणि त्यासाठी तुम्हाला योग्य डिव्हाइसेसची गरज आहे. तुम्हीही अशा भन्नाट स्मार्ट टीव्हीच्या शोधात असाल तर, आज आम्ही तुम्हाला ई-कॉमर्स साइट Amazon वर टॉप ५ स्मार्ट टीव्हीबद्दल सविस्तर माहिती देणार आहो. विशेष म्हणजे ,हे टीव्ही तुम्ही आता स्वस्तात खरेदी करू शकणार आहात.या यादीमध्ये Mi Horizon, LG Smart LED TV, Samsung Wondertainment आणि Redmi 4K Ultra, Vu 4K series स्मार्ट Android LED TV यांचा समावेश आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Wonderment Series HD Ready LED Smart TV

samsung-wonderment-series-hd-ready-led-smart-tv

Samsung Wonderment Series HD Ready LED Smart TV मध्ये ३२-इंचाचा डिस्प्ले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, डिव्हाइस २० W डॉल्बी ऑडिओने सुसज्ज आहे. या टीव्हीमध्ये कनेक्ट शेअर मूव्ही वैशिष्ट्य समाविष्ट आहे. ज्याचा वापर करून तुम्ही एकाच वेळी अनेक उपकरणांवर कन्टेन्ट पाहू शकता. या टीव्हीमध्ये तुम्ही व्हर्च्युअल मूव्ही डेटचा आनंद घेऊ शकता. एक वैयक्तिक संगणक मोड देखील आहे, जो काम आणि मनोरंजन दोन्ही अनुभव प्रदान करतो. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही हा स्मार्ट टीव्ही १६,९९० रुपयांना खरेदी करू शकता.

Vu 4K Series Smart Android LED TV

vu-4k-series-smart-android-led-tv

टीव्ही ६० Hz च्या रीफ्रेश रेटसह ४३-इंचाचा 4K अल्ट्रा HD रिझोल्यूशन डिस्प्ले पॅक करते. या टीव्हीमध्ये १७८ डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगल आहे. साऊंड सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, ते ३० W डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करते. या टीव्हीमध्ये व्हर्च्युअल सराउंड साउंड फंक्शनॅलिटी उपलब्ध आहे. इतर वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ते Google Play Store, Act/Voice रिमोट कंट्रोल, Google Ecosystem (चित्रपट, टीव्ही, संगीत, गेम्स), इन-बिल्ट क्रोमकास्ट आणि ब्लूटूथ ५.० सपोर्टसह येते. , तुम्ही Vu 4K series smart Android LED TV smart टीव्ही २७,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

Redmi 4K Ultra HD Android Smart LED TV

redmi-4k-ultra-hd-android-smart-led-tv

Redmi 4K अल्ट्रा एचडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही मध्ये ५० इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या यादीत हा स्मार्ट टीव्ही तिसऱ्या क्रमांकावर आहे. अल्ट्रा-हाय डेफिनिशन पाहण्याच्या अनुभवासाठी टीव्ही ८ दशलक्ष पिक्सेलसह 4K HDR सह उत्कृष्ट प्रतिमा गुणवत्ता प्रदान करतो. या टीव्हीमध्ये ३० W स्पीकर आहेत. जे एक शक्तिशाली अनुभव देतात. या टीव्हीमध्ये तुम्ही भाषा युनिव्हर्स वैशिष्ट्यासह २५ + OTT अॅप्समध्ये १६ + भाषांमध्ये कन्टेन्ट शोधू शकता. डिव्हाइस Android TV 10 वर काम करते. या टीव्हीमध्ये इनबिल्ट Chromecast आणि OK Google सपोर्ट आहे. स्मार्ट टीव्हीची खरी किंमत ४४,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही Amazon वर ३५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

Mi Horizon Full HD Android LED TV

mi-horizon-full-hd-android-led-tv

Mi Horizon Full HD Android LED TV मध्ये ४०-इंचाचा डिस्प्ले आहे. जो १७८-डिग्री वाइड व्ह्यूइंग अँगलसह इमर्सिव्ह डिझाइन ऑफर करतो. डिव्हाईस २० W स्टीरिओ स्पीकर्स DTS-HD सह सराउंड साउंड अनुभव देते. ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे झाले तर, ते Android TV 9 वर काम करते आणि त्यात इनबिल्ट Chromecast आणि एक यूनिवर्सल सर्च पर्याय आहे. Mali-450 GPU सह शक्तिशाली ६४-बिट क्वाड-कोर प्रोसेसरसह एम्बेड केलेले आहे. जे खरोखर स्मूथ अनुभव देते. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास Mi Horizon Full HD Android LED TV स्मार्ट टीव्हीची खरी किंमत २९,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही Amazon वर २४,९९९ रुपयांना खरेदी करू शकता.

LG HD Ready Smart LED TV

lg-hd-ready-smart-led-tv

LG HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये ३२ इंचाचा डिस्प्ले आहे. स्मार्ट एलईडी टीव्हीमध्ये पाहण्याचा अनुभव वाढवण्यासाठी, स्लिम बेझल्स आणि ५० Hz रिफ्रेश दर देण्यात आला आहे. हे प्रगत इमेज प्रोसेसरसह येते जे बॅलेन्स्ड आणि अधिक नैसर्गिक प्रतिमेसाठी रंग अड्जस्ट करते. टीव्ही १० W डॉल्बी ऑडिओ सपोर्ट आणि सक्रिय HDR सह येतो . ज्यामुळे घर बसल्या थिएटरसारखा अनुभव मिळतो. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, एलजी एचडी रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही टीव्हीची खरी किंमत २३,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही TV Amazon वरून फक्त १७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here