Noise ColorFit Pulse Grand

Noise ने काही दिवसांपूर्वीच आपल्या ColorFit Pulse Grand स्मार्टवॉचला भारतात लाँच केले आहे. लाँचिंग ऑफर अंतर्गत सध्या या वॉचची १,९९९ रुपयात विक्री होत आहे. तुम्ही Amazon वरून या वॉचला खरेदी करू शकता. नंतर या वॉचच्या किंमतीत वाढ होऊ शकते. यामध्ये १.६९ इंच डिस्प्ले, ६० स्पोर्ट्स मोड मिळतील. तसेच, १५० पेक्षा अधिक वॉच फेस देखील दिले आहेत. तसेच, हार्ट रेट मॉनिटर, स्ट्रेस मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन सेंसर, स्लीप मॉनिटर आणि मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकर सारखे फीचर्स दिले आहेत.
TAGG Verve Active

TAGG Verve Active स्मार्टवॉचची किंमत देखील २ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. ही वॉच फक्त १,८९९ रुपयात फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. यामध्ये १.७ इंचाचा मोठा डिस्प्ले दिला आहे. हेल्थ फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये तुम्हाला ब्लड ऑक्सिजन सेंसर, बॉडी टेंप्रेचर मॉनिटर, हार्ट रेट मॉनिटर, ब्लड प्रेशर मॉनिटर, मेंस्ट्रुअल सायकल ट्रॅकरसह अनेक फीचर्स मिळतील. यामध्ये २४ स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट दिला आहे. तसेच, ८ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते.
ZEBRONICS ZEB-FIT8220CH

ZEBRONICS ZEB-FIT8220CH स्मार्टवॉच Flipkart वर स्वस्तात उपलब्ध आहे. या स्मार्टवॉचची किंमत १,९९९ रुपये आहे. यामध्ये ब्लड प्रेशर मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन सेंसर, हार्ट रेट मॉनिटर सारखे अनेक हेल्थ फीचर्स दिले आहे. तसेच, १२ स्पोर्ट्स मोड्स आणि ड्यूल मेन्यू यूआय सारखे फीचर्स देखील मिळतात. सिंगल चार्जमध्ये नियमित वापरासह वॉचची बॅटरी ७ दिवस टिकते. यामध्ये मोठा डिस्प्ले दिला आहे. तसेच, कॉलिंग आणि एसएमएस नॉटिफिकेशनची देखील सुविधा मिळते.
DEFY Space

DEFY Space स्मार्टवॉचला तुम्ही Flipkart वरून स्वस्तात खरेदी करू शकता. या वॉचची किंमत १,७२४ रुपये आहे. यामध्ये तुम्हाला १.६९ इंचाचा शानदार एचडी डिस्प्ले मिळेल. वॉच हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सीजन सेंसरसह अनेक हेल्थ फीचर्ससह येते. यामध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स आणि वॉच फेसचा देखील सपोर्ट दिला आहे. डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंटसाठी वॉचला आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. याची बॅटरी १० दिवस टिकते.
AQFIT W6

AQFIT W6 स्मार्टवॉच Amazon वर १,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यामध्ये १.६९ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला आहे. याशिवाय हार्ट रेट मॉनिटर, ब्लड ऑक्सिजन मॉनिटर, स्लीप ट्रॅकर, ब्रीथ मोड सारखे हेल्थ फीचर्स यात दिले आहे. तसेच, १५ स्पोर्ट्स मोडचा देखील सपोर्ट मिळतो. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १० दिवस टिकते. याशिवाय म्यूझिक, कॅमेरा कंट्रोल सारखे फीचर्स देखील या वॉचमध्ये मिळतात. २ हजार रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या या वॉच तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरतील.
(नोट – प्रोडक्ट्सच्या किंमतीत ऑफर्स आणि स्टॉकनुसार बदल होऊ शकतो.)
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times