दावा

एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जात आहे. ज्यात एक व्यक्ती पोलिस गाडीत बसलेली आहे. ही व्यक्ती समोर बसलेल्या पोलिसाच्या अंगावर थुंकली आहे. या व्हिडिओतून दावा करण्यात येत आहे की, पोलिसाच्या अंगावर थुंकणारी व्यक्ती
मरकजमध्ये आली होती.

टाइम्स फॅक्ट चेकला हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर अनेक वाचकांनी पाठवला. तसेच या व्हिडिओसंबंधी खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?

हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील ठाण्याचा आहे. दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये
मरकजशी या व्हिडिओचा काहीही संबंध नाही.

च्या एका बातमीनुसार, एका २६ वर्षीय आरोपीने पोलिसावर थुंकल्याचा प्रकार घडला. कारण मुंबई कोर्टात त्या आरोपीला घरून आलेले जेवण जेवू दिले नाही. या आरोपीला या दिवशी कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ठाणे सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले.

मुंबई मिररच्या रिपोर्टमध्ये हा व्हिडिओ आहे. जो आता चुकीच्या दाव्याने शेअर केला जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here