Hitachi 1.5 Ton 5 Star Inverter Split AC

लवकरच उन्हाळा सुरू होणार असून, या निमित्ताने तुम्ही जर एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरेल. Hitachi च्या या एसीची किंमत ६०,५०० रुपये आहे. मात्र, १९,५१० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त ४०,९९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय दरमहिना फक्त १,९३० रुपये देऊन ईएमआयवर देखील या प्रोडक्ट्सला खरेदी करणे शक्य आहे. यावर ४,४३० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. या एसीची क्षमता १.५ टन असून, हा ५ स्टार रेटिंगसह येतो.
Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC

Lloyd 1.5 Ton 3 Star Voice & WiFi Enabled Inverter Split AC ची मूळ किंमत ६५,९९० रुपये आहे. मात्र, Amazon Summer Appliances Fest सेलमध्ये ३३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त ३२,९९० रुपयात खरेदी करू शकता. या एसीला तुम्ही दरमहिना फक्त १,५५३ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. याशिवाय, एसीवर ४,४३० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळेल. या ३ स्टार रेटिंग असणाऱ्या एसीची क्षमता १.५ टन आहे.
Samsung 192 L 2 Star Direct Cool Single Door Refrigerator

उन्हाळ्यात थंड पाणी, आइस्क्रीन अशा विविध गोष्टींसाठी घरात एक फ्रिज असायलाच हवा. तुम्ही जर नवीन फ्रिज खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Samsung चा हा फ्रिज एक चांगला पर्याय ठरेल. सॅमसंगच्या या फ्रिजची मूळ किंमत १४,९९० रुपये आहे. मात्र, २ हजार रुपये डिस्काउंटनंतर फक्त १२,९९० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, दरमहिना फक्त ६११ रुपये देऊन देखील टीव्हीला खरेदी करू शकता. यावर १०,३९२ रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. हा सिंगल डोर फ्रिज असून, याची क्षमता १९२ लीटर आहे.
Whirlpool 200 L 4 Star Inverter Direct-Cool Single Door Refrigerator

Whirlpool चा हा फ्रिज तुमच्या घरासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. या फ्रिजची मूळ किंमत २०,१५० रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फक्त १६,९९० रुपयात खरेदी करू शकता. Whirlpool चा फ्रिज दरमहिना फक्त ८०० रुपये देऊन ईएमआयवर घरी नेऊ शकता. यावर २,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. हा देखील सिंगल डोर फ्रिज असून, याची क्षमता २०० लीटर आहे. हा ४ स्टार रेटिंगसह येणारा फ्रिज आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times