ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वर Electronics Day Sale सुरू झाला आहे. आजपासून (२३ फेब्रुवारी) सुरू झालेल्या या सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्हींना खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. Flipkart Electronics Day Sale मध्ये Blaupunkt, Kodak आणि Thomson च्या स्मार्ट टीव्हींना बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्ट टीव्हींवर तुम्हाला आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. या स्मार्ट टीव्हींना ICICI बँक कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा मिळेल. फ्लिपकार्टवर सुरू असलेला इलेक्ट्रॉनिक्स डे सेल २८ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल फायद्याचा ठरेल. सेलमध्ये ३२ इंच, ४३ इंच आणि ५५ इंच स्मार्ट टीव्हींना स्वस्तात खरेदी करू शकता. याशिवाय वॉशिंग मशीन व अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर देखील बंपर डिस्काउंट मिळेल.

​Blaupunkt च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

blaupunkt-

फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक डेज सेलमध्ये Blaupunkt चे स्मार्ट टीव्ही आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. या स्मार्ट टीव्हींवर ३ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. सेलमध्ये ३२ इंचाचा Blaupunkt साइबरसाउंड स्मार्ट टीव्ही १२,९९९ रुपयात उपलब्ध आहे. या टीव्हीची मूळ किंमत १३,९९९ रुपये आहे. Blaupunkt CyberSound ४२-इंच स्मार्ट टीव्ही १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यात फुल एचडी डिस्प्ले आणि ४० वॉटचे स्पीकर मिळतात. तसेच, कंपनीच्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Thomson च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्स

thomson-

फ्लिपकार्टवर Thomson चे स्मार्ट टीव्ही ५ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहेत. इलेक्ट्रॉनिक डे सेलमध्ये Thomson Path, Oath Pro and Oath Pro Max स्मार्ट टीव्हीच्या रेंजवर मोठी सूट मिळत आहे. Thomson ३२ इंच PATH0011 फ्लिपकार्ट सेलमध्ये फक्त ११,९९९ रुपयात मिळेल. तर थॉमसन ४९ इंच PATH7777 स्मार्ट टीव्हीला २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. Thomson च्या ७५ इंच OATHPRO2121 स्मार्ट टीव्हीवर ५ हजार रुपये डिस्काउंट मिळत आहे. या टीव्हीला तुम्ही ९९,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Kodak च्या स्मार्ट टीव्हींवर आकर्षक ऑफर

kodak-

फ्लिपकार्ट सेलमघ्ये Kodak CA सीरिज आणि 7XPro टीव्ही मॉडेलवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळतो. २४, ३२, ५५ इंच आणि ६५ इंच पर्यायामध्ये कोडक सीए सीरिज २४,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे. दुसरीकडे कोडक ७एक्स प्रो सीरिजमधील ३२ इंच ते ५५ इंच स्मार्ट टीव्ही १२,४९९ रुपयांपासून ते ३३,९९९ रुपयांपर्यंतच्या किंमतीत उपलब्ध आहेत. कोडकच्या सीए सीरिजमध्ये ४के एचडीआर१० डिस्प्ले, डॉल्बी डिजिटल प्लस ऑडिओ आणि डीटीएस ट्रू सराउंड साउंड सारखे फीचर्स मिळतील. तसेच, कोडक 7XPro मॉडेलमध्ये देखील अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत.

​Kodak च्या टीव्हीची सुरुवाती किंमत फक्त ७,९९९ रुपये

kodak-

Flipkart वर सुरू असलेल्या Electronics Day Sale मध्ये तुम्ही फक्त ७,९९९ रुपयात स्मार्ट टीव्हीला खरेदी करू शकता. सेलमध्ये या किंमतीत Kodak चा २४ इंच HD Ready LED TV उपलब्ध आहे. तसेच, ३२ इंच स्मार्ट टीव्हीला ११,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या टीव्हीवर तुम्हाला बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. तसेच, या टीव्हींना तुम्ही ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. दरम्यान, प्लिपकार्ट सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्हीसह इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सला देखील स्वस्तात खरेदी करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here