टेलिकॉम कंपनी Airtel आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया आणि बीएसएनएलला टक्कर देण्यासाठी एकापेक्षा एक शानदार प्लान्स ऑफर करत आहे. कंपनीकडे यूजर्सच्या गरजेनुसार अनेक प्रीपेड प्लान्स उपलब्ध आहेत. कंपनीकडे कमी किंमतीत वेगवेगळे बेनिफिट्स आणि वैधतेसह येणारे प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लान्समध्ये केवळ डेटा, कॉलिंग आणि एसएमएस नाही तर अतिरिक्त बेनिफिट्सचा फायदा देखील मिळेल. Airtel चे हे प्लान्स Amazon Prime व्हिडिओ बेनिफिट्ससह येतात. तुम्ही जर खूपच कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे प्लान्स शोधत असाल तर या प्लान्सचा तुम्हा नक्कीच फायदा होईल. एअरटेलचे हे पॉकेट फ्रेंडली प्लान्स आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त दररोज १० रुपये खर्चून २ जीबी डेटाचा फायदा मिळेल. एअरटेलच्या सुरुवाती प्लान्सची किंमत फक्त १५५ रुपये आहे. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Airtel चा १५५ रुपये आणि १७९ रुपयांचा प्लान

airtel-

टेलिकॉम कंपनी Airtel कडे १५५ रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. १५५ रुपयांच्या या प्लानची वैधता २४ दिवस असून, यामध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळतो. याशिवाय एकूण १ जीबी डेटा आणि एकूण ३०० एसएमएस मिळतील. कंपनीकडे १७९ रुपयांचा प्लान असून, यात देशभरात अनलिमिटेड वॉइस कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच, एकूण २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतील. या प्लानची वैधता २८ दिवस आहे.

​Airtel चा २०९ रुपये आणि २३९ रुपयांचा प्लान

airtel-

Airtel कडे २०९ रुपये किंमतीचा प्लान असून, याची वैधता २१ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २१ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, २३९ रुपयांचा प्लान २४ दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण२४ जीबी डेटा मिळेल. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात.

​एअरटेलचा २६५ रुपये आणि २९९ रुपयांचा प्लान

कंपनीकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा २६५ रुपयांचा प्लान आहे. या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा याप्रमाणे एकूण २८ जीबी डेटा मिळेल. तसेच, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. Airtel कडे २९९ रुपयांचा प्लान देखील आहे. या प्लानची वैधता २८ दिवस असून, यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, देशभरात सर्व नेटवर्कवर फ्री वॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएस मिळतात.

​Airtel चा ३५९ रुपये आणि ४९९ रुपयांचा प्लान

airtel-

टेलिकॉम कंपनी Airtel च्या ३५९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा याप्रमाणे संपूर्ण कालावधीसाठी एकूण ५६ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसचा फायदा दिला जात आहे. कंपनीकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा आणखी एक प्लान उपलब्ध आहे. या प्लानची वैधता ४९९ रुपये असून, यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये Disney+ Hotstar मोबाइलचे सबस्क्रिप्शन मिळते.

​Airtel चा ४७९ रुपये आणि ५४९ रुपयांचा प्लान

airtel-

Airtel च्या ४७९ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस आहे. या प्लानमध्ये तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीकडे ५४९ रुपयांचा प्लान असून, या प्लानची वैधता देखील ५६ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. दरम्यान, वर दिलेले सर्व प्लान्स Amazon Prime Video चे मोबाइल व्हर्जन आणि Wynk Music च्या फ्री सबस्क्रिप्शनसह येतात.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here