२०२२ हे वर्ष नवीन स्मार्टफोन्सच्या लाँचसाठी खूप व्यस्त असून आतापर्यंतच्या दोन महिन्यांच्या कालावधीत बहुतांश स्मार्टफोन निर्मात्यांनी भारतात नवीन स्मार्टफोन सादर केले आहेत. गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये OnePlus 9RT, Vivo V23 Pro आणि Xiaomi 11T Pro सारखे स्मार्टफोन सादर करण्यात आले तर, या स्मार्टफोन्स नंतर, सॅमसंगने फ्लॅगशिप S22 सीरीज सादर केली. त्यानंतर Xiaomiने Redmi Note 11 आणि OnePlusने आपले बजेट डिव्हाइस OnePlus Nord 2 CE सादर केले. आज आम्ही तुमच्यासाठी यावर्षी लाँच झालेल्या काही जबरदस्त स्मार्टफोनची लिस्ट घेऊन आलो आहोत. यात Vivo V23 Pro 5G, Xiaomi 11T Pro, OnePlus 9RT, Samsung Galaxy S22, Samsung Galaxy S22 Ultra, Samsung Galaxy S22+, Realme 9 Pro, Redmi Note 11, Redmi Note 11S, OnePlus CE Nord चा समावेश आहे.

Xiaomi 11T pro

xiaomi-11t-pro

Xiaomi 11T Pro ६. ६७ -इंचाचा AMOLED डिस्प्ले दाखवतो. स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 12.5 वर काम करतो. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. जी, १२० W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. Xiaomi 11T Pro च्या ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४१,९९९ रुपये आहे

Vivo V23 Pro 5G: फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.५६ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. कॅमेरामध्ये १०८ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा ,८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. समोर, ५० -मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि ८ -मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये ४३०० mAh ची बॅटरी आहे, जी ४४ W फास्ट चार्जिंगद्वारे समर्थित आहे. फोनच्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ३८,९९९ रुपये आहे.

Redmi Note 11

redmi-note-11

Redmi Note 11 मध्ये ६.४३ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात ६GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनचा मागील कॅमेरा ५० मेगापिक्सेल, ८ मेगापिक्सेल दुसरा कॅमेरा,२ मेगापिक्सेल तिसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी मिळते. फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये आहे.

Redmi Note 11S मध्ये ६.४३ इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये ३३ W चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारित MIUI 13 वर काम करतो. Redmi Note 11S च्या ६ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,४९९ रुपये आहे.

One Plus Nord CE 2

one-plus-nord-ce-2

OnePlus Nord CE 2 Octa core MediaTek MT6877 Dimensity 900 5G (६ nm) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. हा स्मार्टफोन ६GB आणि १२८ GB स्टोरेज आणि ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात ४५०० mAh बॅटरी आहे. जी, ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Nord CE 2 च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आहे.

Realme 9 Pro: Realme 9 Pro मध्ये ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ६४ -मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. फोनच्या ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे.

One Plus 9RT

one-plus-9rt

OnePlus 9RT मध्ये ६.६२ -इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा कोअर क्वालकॉम SM8350 स्नॅपड्रॅगन 888 5G (५ nm) वर काम करतो. या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, १६ मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४५०० mAh बॅटरी आहे. जी ६५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus 9RT च्या ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ४२,९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy S22

samsung-galaxy-s22

Samsung Galaxy S22 मध्ये ६.६ इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे. ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. या स्मार्टफोनच्या मागील कॅमेरामध्ये ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, १० मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा आणि १२ मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ३७०० mAh बॅटरी आहे जी २५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Galaxy S22 च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत ७२,९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy S22+: Samsung Galaxy S22+६.६ इंचाचा डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले दाखवतो. यात ४५०० mAh बॅटरी आहे. जी, ४५ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Samsung Galaxy S22+ च्या ८GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८४,९९९ रुपये आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here