मुलं इंटरनेटवर काय पाहत आहे याबद्दल पालकांना काळजी असते. तुम्हाला देखील ही चिंता सतावत असेल तर यात एक अॅप तुमची मदत करू शकते. याच्या मदतीने मुल फोनवर कुठे आणि काय पाहत आहे हे तुम्ही सहज शोधू शकता. मुलं फक्त एकाच गोष्टीचा हट्ट धरतात आणि त्यासमोर पालक हरतात. तो म्हणजे स्मार्टफोन, मुलांना स्मार्टफोनला चिकटून राहण्याची सवय लागते. त्यामुळे पालक नाराज होतात. फोन हातात येताच मुले यूट्यूब, व्हॉट्सअॅप आणि इतर अनेक अॅप्स ऍक्सेस करतात. मुल समोर असेल तर ठीक. पण, जेव्हा मुल फोनसोबत एकटे असतात तेव्हा मुलं फोनवर काय करतात .हे कळायला मार्ग नसतो. या प्रकरणात एक अॅप तुमची मदत करू शकते. App च्या मदतीने मुल फोनवर कुठे आणि काय पाहत आहे हे तुम्ही सहज शोधू शकता.

​फोन लॉकही करता येतो

फोन लॉकही करता येतो: जर तुमची मुलं रात्रभर स्मार्टफोन वापरत असतील तर तुम्ही या अॅपच्या मदतीने मुलाचा फोन लॉक करू शकता. लॉक केल्यानंतर तुमच्या मुलांना तुमच्या परमिशन शिवाय स्मार्टफोन वापरता येणार नाही.

लोकेशन शोधू शकता: मुलं कुठे आहे याची पालकांना सर्वात जास्त काळजी असते. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमची मुलं कोणत्या वेळी कुठे आहे हे जाणून घेऊ शकाल. तुम्हाला फक्त अॅपवर लोकेशन मोड ठेवावा लागेल. कोणत्या वेळी मूल कुठे आहे? तुम्ही लोकेशन सहज ट्रॅक करू शकाल

टाईम लिमिट सेट करा

टाईम लिमिट सेट करा: आजकालची मुलं वेळ स्मार्टफोनवर घालवतात .मुलांच्या हातातून स्मार्टफोन घेतला तर ते लगेच गोंधळ करतात. अशात, त्यांना एकप्रकारे स्मार्टफोनचे व्यसनच आहे. असे म्हणता येईल. तुमच्या मुलाला स्मार्टफोनला चिकटवण्याची सवय असल्यास, तुम्ही यात या अपची मदत घेऊ शकता. तुम्ही वेळ मर्यादा सेट करू शकता. अॅपमध्ये वेळ मर्यादा सेट करण्याचा पर्याय आहे. वेळेची मर्यादा निश्चित होताच मुलाचा स्मार्टफोन लॉक होईल आणि आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ तुमचा फोन वापरू शकणार नाही.

App हालचालींवर ठेवणार लक्ष

app-

प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणार: मुलं किती वेळ स्मार्टफोनवर आहे हे अॅप सांगेल. तुमची मुलं कोणते अॅप वापरत आहे, याचाही तपशील Family Link अॅपवर असेल. मुलाने कोणतेही अॅप इंस्टॉल केले आणि हटवले असल्यास, त्याचे तपशील देखील तुम्हाला दृश्यमान असतील.

अॅप्सवर बंदी घातली जाऊ शकते: तुमच्या मुलाच्या स्मार्टफोनमध्ये एखादे अॅप अनावश्यक असेल तर तुम्ही तुमच्या फोनवरूनच त्यावर बंदी घालू शकाल. समजा, मुलाने प्ले स्टोअरवरून एखादे अॅप इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही ते तुमच्या फोनवरूनच बॅन करू शकता.

​अॅप ठेवणार वॉच

अॅप ठेवणार वॉच: आजकाल मुलं इतकी हुशार झाली आहेत की, सर्च हिस्ट्रीही डिलीट करतात. जेणेकरून पालकांना आपण काय पाहतोय हे कळू नये. मुलांना इंटरनेटचा योग्य वापर करता यावा यासाठी गुगलने गुगल फॅमिली अॅप हे अॅप तयार केले आहे. तुमचे मूल तरुण किंवा किशोरवयीन असल्यास, तुम्ही Family Link अॅपवर इंटरनेट वापरण्यासाठी नियम तयार करू शकता. तुम्ही तुमच्या मुलाच्या फोनवर हे अॅप इन्स्टॉल करू शकता आणि एक्सेस स्वतःजवळ ठेवू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here