गेल्या दोन वर्षात करोना व्हायरस महामारी, युद्ध अशा अनेक गोष्टी विशेष चर्चेत आहे. करोना व्हायरसमुळे जगभरात मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, याच काळात टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. दरवर्षी विज्ञान आणि टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत असतात, मात्र यावेळी याची संख्या जास्त आहे. वर्ष २०२२ सुरू होवून फक्त २ महिने झाले असून या कालावधीत जगभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे जगातील सर्वात पॉवरफुल टेलिस्कोप लाँच झाला आहे, तर दुसरीकडे defibrillator ची वेळेवर डिलिव्हरी केल्यानं ७१ वर्षांच्या वृद्धाचे प्राण वाचवण्यात आले. तसेच, पहिल्यांदा कार्बन कॅप्चर टेक्नोलॉजीचा देखील शोध लावला असून, एलन मस्क यांनी ७३० कोटी रुपये गुंतणूक करणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसात विज्ञान आणि टेक्नोलॉजी क्षेत्रात घडलेल्या अशाच काही महत्त्वाच्या घटनांबबात जाणून घेऊया.

​जगातील सर्वात पॉवरफुल टेलिस्कोप

नासाद्वारे पाठवण्यात आलेला जगातील सर्वात पॉवरफुल जेम्स वेब टेलिस्कोप २४ जानेवारीला पृथ्वीपासून एक मिलियन मैल लांब आपल्या अंतिम स्थानावर पोहचला आहे. हा टेलिस्कोप पृथ्वीपासून जवळपास १.५ मिलियन किमी लांब लँग्रेज प्लाइंट (एल२) कक्षेत आहे. हे पृथ्वीप्रमाणे सूर्याची परिक्रमा करेल. टेलिस्कोप अंतराळात ३० दिवसांच्या प्रवासानंतर अंतिम ठिकाणी पोहचला आहे. हा टेलिस्कोप हब्बलपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली असून, अंतराळातील सुक्ष्म अभ्यास करण्यास सक्षम आहे. टेलिस्कोपच्या ऑप्टिक्सवर २५ लाख रुपयांची सोन्याची परत चढवली आहे. थोडक्यात, याला चंद्रावर ठेवल्यास पृथ्वीवर उडणारी माशी देखील सहज डिटेक्ट करेल. यासाठी जवळपास ९.७ बिलियन्स डॉलर्स खर्च आला.

​ड्रोनद्वारे पहिल्यांदाच डिफाइब्रिलेटरची डिलिव्हरी

ड्रोनचा वापर अनेक कामांसाठी केला जात आहे. लष्कराकडून देखील ड्रोनचा वापर केला जातो. तसेच, वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी देखील याचा उपयोग होतो. मात्र, पहिल्यांदाच स्वीडनमध्ये ड्रोनचा वापर मेडिकल इमर्जेंसीसाठी करण्यात आला. स्वीडनमध्ये ७१ वर्षीय वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवण्यात ड्रोनची महत्त्वाची भूमिका होती. एका वृद्ध व्यक्तीला खाली कोसळताना हार्ट अटॅक आला, त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून defibrillator ची डिलिव्हरी करण्यात आली व त्यांचे प्राण वाचले. Defibrillator हे असे डिव्हाइस आहे, ज्याचा कार्डिएक अरेस्ट दरम्यान इलेक्ट्रिक शॉकसाठी उपयोग होतो.

​कार्बन कॅप्चर टेक्नोलॉजी

कार्बन कॅप्चर टेक्नोलॉजी गेल्या काही दिवसात विशेष चर्चेत आहे. डेलावेअर विद्यापीठाच्या संशोधकांनी हायड्रोजनद्वारे संचालित विद्युत रासायनिक प्रणालीचा वापर करून हवेतून ९९ टक्के कार्बन डायऑक्साइडला कॅप्चर केल्याचा व्हिडिओ दाखवला होता. टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांनी देखील या टेक्नोलॉजीवर जवळपास ७३० कोटी रुपये खर्च करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले की, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन टेक्नोलॉजीचा शोध लावणाऱ्या व्यक्तीला ७३० कोटी रुपये बक्षीस देईल. दरम्यान, ही टेक्नोलॉजी काय आहे जाणून घेणे गरजेचे आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साइडला कॅप्चर करण्याची प्रक्रियाच कार्बन कॅप्चर टेक्नोलॉजी आहे. फॅक्ट्री व इतर प्लांटमधून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साइडला कॅप्चर करून अन्य ठिकाणी स्टोर केले जाईल, ज्यामुळे पर्यावरणाची रक्षा करत येईल.

​सर्वात वेगवान डीएनए सिक्वेंसिंगचा गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने काही दिवसांपूर्वीच स्टँनफोर्ड यूनिव्हर्सिटीतील संशोधकांना सर्वात वेगवान डीएन अनुक्रम टेक्नोलॉजीसाठी प्रमाणपत्र दिले आहे. सर्वात वेगवान डीएनए सिक्वेंसिंग हे आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि एक्सिलेरेटेड कॉम्प्युटरच्या मदतीने केले आहे. यासाठी ५ तास आणि २ मिनिटं लागली. या दरम्यान डॉक्टरांना एका रुग्णाचे रक्त घेतले व त्याच दिवशी आनुवांशिक डिसऑर्डर रुग्णाला बरे केले. सर्वसाधारणपणे यासाठी एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लागतो. हे संशोधन १२ रुग्णांवर झाले, ज्यातील ५ रुग्ण काही तासातच बरे झाले. या संशोधनात गुगल आणि NVIDIA ची देखील मदत घेतली.

​पहिल्यांदाच एचआयव्हीपासून मुक्त झाली महिला

अमेरिकेतील डॉक्टरांच्या टीमने एका एचआयव्हीग्रस्त महिलेला बरे केले आहे. पहिल्यांदाच स्टेमसेल ट्रान्सप्लांटद्वारे कोणावर यशस्वी उपचार झाला आहे. तसेच, हे स्टेमसेल अशा एका व्यक्तीने दान केले होते, ज्यामध्ये आधीपासूनच एचआयव्ही व्हायरसविरोधात लढण्याची नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती.

स्टीलपेक्षा मजबूत आणि प्लास्टिकपेक्षा हलका पदार्थ

मॅसाच्यूसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या केमिकल इंजिनअर्सच्या एका टीमने असे एक मटेरियल तयार केले आहे, जे स्टीलपेक्षा मजबूत आणि प्लास्टिकपेक्षा हलके आहे. हे मटेरियल पॉलिमराइजेशन प्रक्रियेद्वारे तयार केले आहे. याचा वापर कारचे पार्ट्स, कोटिंग अथवा पुलांच्या निर्मितीमध्ये होईल. तसेच, गंज लागण्याचीही समस्या येणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here