ई-कॉमर्स साइट Flipkart वर Electronics Day Sale सेल सुरू आहे. २३ फेब्रुवारीपासून या सेलला सुरुवात झाली आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये Blaupunkt, Kodak आणि Thomson च्या स्मार्ट टीव्हींना स्वस्तात खरेदी करू शकता. या स्मार्ट टीव्हींना तुम्ही ICICI बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास १० टक्के अतिरिक्त कॅशबॅकचा फायदा मिळेल. याशिवाय इतर अनेक शानदार ऑफर्सचा देखील फायदा मिळत आहे. सेलमध्ये तुम्ही ३२ इंच, ४२ इंच, ४३ इंच, ७५ इंच स्मार्ट टीव्हींना स्वस्तात खरेदी करू शकता. हे स्मार्ट टीव्ही दमदार फीचर्ससह येतात. Flipkart इलेक्ट्रॉनिक्स डे सेल २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये वॉशिंग मशीन आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर देखील ऑफरचा फायदा मिळेल.

​Blaupunkt ३२ इंच स्मार्ट टीव्ही

blaupunkt-

Blaupunkt Smart TV मध्ये ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आणि ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट आहे. यात वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. यात ४० वॉट स्पीकर दिले आहेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी ३ HDMI आणि २ USB पोर्ट आहे. या टीव्हीला फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Blaupunkt CyberSound ४२ इंच स्मार्ट टीव्ही

यामध्ये ४२ इंच Full HD LED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये देखील ३२ इंच टीव्हीप्रमाणे जवळपास सारखेच फीचर्स दिले आहेत. हा टीव्ही सेलमध्ये १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

​Blaupunkt CyberSound ४३ इंच स्मार्ट टीव्ही

blaupunkt-cybersound-

Blaupunkt CyberSound च्या या टीव्हीत ३२ इंच Ultra HD (4K) LED डिस्प्ले असून, रिझॉल्यूशन ३८४०x२१६९ पिक्सल आणि रिफेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात Netflix, Prime Video, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यामध्ये ५० वॉट स्पीकर आउटपूट दिले आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी ३ HDMI आणि २ USB पोर्ट दिले आहेत. सेलमध्ये हा स्मार्ट टीव्ही फक्त २७,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

​Thomson 32 स्मार्ट टीव्ही

thomson-32-

Thomson च्या या स्मार्ट टीव्हीत ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले असून, याचे रिझॉल्यूशन १३६६x७६८ पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. या टीव्हीमध्ये वेगवेगळ्या अ‍ॅप्सचा दिला आहे. यात २४ वॉट स्पीकर आउटपूट, कनेक्टिव्हिटीसाठी ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. १ वर्षाच्या वॉरंटीसह येणाऱ्या या टीव्हीची किंमत ११,९९९ रुपये आहे.

Thomson ४० स्मार्ट टीव्ही

या स्मार्ट टीव्हीमध्ये ४० इंच Full HD LED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात २४ वॉट स्पीकर आउटपूट आणि ३ एचडीएमआय व २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. १ वर्षाच्या वॉरंटीसह येणाऱ्या या टीव्हीला तुम्ही १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Thomson ७५ स्मार्ट टीव्ही

thomson-

या टीव्हीत ७५ इंच Ultra HD (4K) LED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यामध्ये Netflix, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. हा टीव्ही अँड्राइड ओएसवर काम करतो. यामध्ये ३० वॉट स्पीकर आउटपूट दिले आहेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी ३ एचडीएमआय आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहे. हा टीव्ही १ वर्षाच्या वॉरंटीसह येतो. सेलमध्ये हा टीव्ही ९९,९९९ रुपयात उपलब्ध आहे.

​Kodak २४ इंच स्मार्ट टीव्ही

kodak-

या स्मार्ट टीव्हीत २४ इंच HD Ready LED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात २० वॉट स्पीकर आउटपूट दिला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी २ HDMI आणि २ USB पोर्ट दिले आहे. टीव्हीची किंमत फक्त ७,९९९ रुपये असून, यावर १ वर्षाची वॉरंटी मिळते.

Kodak ३२ इंच स्मार्ट टीव्ही

कोडकच्या या टीव्हीत ३२ इंच HD Ready LED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात देखील यात २४ वॉट स्पीकर आउटपूट दिला आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी २ HDMI आणि २ USB पोर्ट दिले आहेत. टीव्हीवर १ वर्षाची वॉरंटी मिळते. टीव्हीला फक्त १२,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Kodak ५५ इंच स्मार्ट टीव्ही

kodak-

या स्मार्ट टीव्हीमध्ये ५५ इंच Ultra HD (4K) LED डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात Prime Video, Netflix, Disney+Hotstar आणि Youtube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. हा टीव्ही अँड्राइडवर काम करतो. यात ३० वॉट स्पीकर आउटपूट दिला आहे. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ३ HDMI आणि २ USB पोर्ट मिळतात. कंपनी टीव्हीवर एक वर्षाची वॉरंटी देत असून, याला फक्त ३४,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here