खासगी टेलिकॉम कंपन्या भारती एअरटेल, रिलायन्स जिओ आणि वोडाफोन आयडियाकडे स्वस्त प्लान्सची मोठी लिस्ट आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या एकापेक्षा एक स्वस्त प्लान्स सादर करत असतात. कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग, जास्त दिवसांची वैधता आणि डेटाचा फायदा मिळतो. कंपन्यांकडे अगदी १४ दिवसांपासून ते ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. अनेकजण वारंवार रिचार्ज करायचे टेंशन नको म्हणून एकदाच वर्षभराचा रिचार्ज करतात. तर काहीजण एकदाच जास्त खर्च करण्याऐवजी दरमहिन्याला रिचार्ज करत असतात. तुम्ही देखील २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स शोधत असाल तर Airtel, Jio आणि Vi कडे असेच काही शानदार प्लान्स उपलब्ध आहेत. खूपच कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतात. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Reliance Jio चे स्वस्त प्लान्स

reliance-jio-

Reliance Jio कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे काही स्वस्त प्लान्स उपलब्ध आहे. कंपनीकडे २९९ रुपयांचा एक शानदार प्लान उपलब्ध असून, याची वैधता २८ दिवस आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, २३९ रुपयांचा देखील प्लान कंपनीकडे उपलब्ध असून, यात दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. तसेच, २०९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा मिळेल. इतर बेनिफिट्स समान आहेत.

​Reliance Jio चा ४९९ रुपये आणि ६०१ रुपयांचा प्लान

reliance-jio-

रिलायन्स जिओच्या ४९९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटासह अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. कंपनीकडे ६०१ रुपयांचा देखील शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये तुम्हाला २८ दिवसांसाठी दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ६ जीबी डेटा मिळेल. तसेच, डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. प्लानमध्ये Jio अ‍ॅप्सचा देखील अ‍ॅक्सेस मिळतो. याशिवाय इतर बेनिफिट्स दोन्ही प्लान्समध्ये समान आहेत.

​Bharti Airtel चे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

bharti-airtel-

Bharti Airtel कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे २६५ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये आणि ५९९ रुपये किंमतीचे प्लान्स आहेत. यामध्ये क्रमशः दररोज १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी डेटा मिळेल. हे सर्व प्लान्स अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल सबस्क्रिप्शनसह येतात. ५९९ रुपयांच्या प्लानमध्ये Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. याशिवाय, या प्लान्समध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात.

कंपनीकडे ४४९ रुपयांचा देखील प्लान उपलब्ध असून, यात २८ दिवसांच्या वैधतेसह दररोज २.५ जीबी डेटा मिळेल. तसेच, १७९ रुपयांच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी एकूण २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस मिळतात.

​Vodafone Idea (Vi) चे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

vodafone-idea-vi-

Vi कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे २६९ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये, ४०९ रुपये आणि ४७५ रुपये किंमतीचे प्लान्स आहेत. यामध्ये क्रमशः १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी, २.५ जीबी आणि ३ जीबी डेटा मिळतो. हे सर्व प्लान्स अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएससह येतात. कंपनीकडे ५०१ रुपयांचा देखील प्लान असून, यात दररोज ३ जीबी डेटा आणि वर्षभरासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या सर्व प्लान्समध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोलओव्हर, दरमहिन्याला २ जीबी डेटा बॅकअपची देखील सुविधा मिळते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here