नवी दिल्लीः अॅपल, सॅमसंग, रेडमी, ओप्पोचे स्मार्टफोन महाग झाल्यानंतर आता स्मार्टफोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्लोबलने आपल्या ग्राहकांना झटका दिला आहे. नोकियाच्या अनेक स्मार्टफोनच्या किंमतीत वाढ केली आहे. ग्राहकांना आता नोकिया ९ प्युअर व्ह्यू, नोकिया १०५, नोकिया २.२ आणि नोकिया ४.२ या स्मार्टफोनसाठी आधीच्या तुलनेत जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच जीएसटीच्या दरात वाढ केल्याने मोबाइल कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

नोकिया ११० या फोनची किंमत आता १६८४ रुपये झाली आहे. याआधी हा फोन १५९९ रुपयांना मिळत होता. नोकिया ६.२ याची किंमत आता १३ हजार १६८ रुपये झाली आहे. आधी १२ हजार ४९९ रुपयांना मिळत होता. नोकिया ७.२ चा ४ जीबी रॅमचा स्मार्टफोनची किंमत आता १६ हजार ३३० रुपये आणि नोकिया ४.२ या स्मार्टफोनची किंमत आता १० हजार ८ रुपये झाली आहे. नोकिया २.२ची किंमत ६ हजार ३२० रुपये आणि नोकिया ३.२ ची किंमत ८ हजार २२८ रुपये झाली आहे. तर नोकिया ९ प्युअर व्ह्यूच्या किंमतीत २ हजार ६७८ रुपयांची वाढ झाली आहे. आता हा फोन ४९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करण्या ऐवजी ५२ हजार ६७७ रुपयांना मिळणार आहे. नोकियाने नव्या किंमती आपल्या अधिकृत साईटवर उपलब्ध केल्या आहेत.

देशात १ एप्रिलपासून जीएसटीत वाढ करण्यात असल्याची घोषणा केल्यानंतर आयफोनने सुद्धा आपल्या फोनमध्ये वाढ केली आहे. जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आल्यानंतर
११ प्रो मॅक्स
ची किंमत आता १ लाख १७ हजार १०० रुपये झाली आहे. तर आयफोन ११ प्रो ची किंमत १ लाख ६ हजार ६०० रुपये झाली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here