आजकाल स्मार्टफोन प्रत्येकाकडे असतो. एखाद्या कम्प्युटरप्रमाणे आजकालचे नवीन स्मार्टफोन्स भन्नाट फीचर्स युजर्सना देतात. ज्यामुळे ऑफिसपासून ते अगदी ऑनलाईन शिक्षणापर्यंत अनेक मोठी कामं स्मार्टफोनवर सहज करता येतात. पण, स्मार्टफोनध्ये नेटवर्क चांगले नाही किंवा फोनमधील इंटरनेटचा स्पीड खूप कमी आहे . अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हालाही खराब नेटवर्क किंवा स्लो इंटरनेट स्पीडचा त्रास होतो ? स्लो इंटरनेटमुळे तुमची महत्वाची कामं रखडतात ? तसे असल्यास, नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे अनेक मार्ग आहेत. प्रत्येक वेळी खराब नेटवर्कचे कारण तुमचा फोन नसून, खराब हवामान किंवा सेल टॉवरची कमतरता देखील त्याची समस्या निर्माण करते. पण, असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही नेटवर्क सुधारू शकता .यासाठी तुम्हाला काही सोप्प्या पण भन्नाट टिप्स मदत करतील. फॉलो करा या टिप्स आणि मिळवा जबरदस्त स्पीड. पाहा डिटेल्स

​नेटवर्क सेटिंग्ज

नेटवर्क सेटिंग्ज: फोनमध्ये नेटवर्क स्लो असण्याची अनेक कारणे असू शकतात. काही वेळा तुम्हाला चांगल्या नेटवर्कसाठी सेटिंग बदलावी लागते . तुम्ही Android युजर असल्यास, तुम्हाला सेटिंग्ज > सामान्य > रीसेट > नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करा वर जावे लागेल. कन्फर्म केल्यानंतर फोन रीस्टार्ट होईल. तर आयफोन वापरकर्ते सेटिंग्ज > सामान्य व्यवस्थापन > रीसेट > नेटवर्क सेटिंग्ज रीसेट करून सेटिंग रीसेट करू शकतात. ती ट्रिक वापरून देखील तुम्ही चांगला नेटवर्क स्पीड मिळवू शकता.

​सिम कार्ड काढा

सिम कार्ड काढा: तुमच्या फोनमध्ये नेटवर्कची गती आवश्यक तेवढी चांगली नसल्यास सिम कार्ड काढणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर तुमच्या फोनला चांगले नेटवर्क मिळत नसेल, तर तुम्हाला स्मार्टफोनमधून सिम कार्ड काढून परत ठेवावे लागेल. अशा प्रकारे, जेव्हा तुमच्या फोनमध्ये नेटवर्क परत येईल, तेव्हा ते अधिक चांगल्या स्थितीत असेल.

सिग्नल बूस्टर: हे सर्व पर्याय काम करत नसल्यास, तुम्ही नेटवर्क बूस्टर वापरून पाहू शकता. सिग्नल बूस्टर तुमचे नेटवर्क सुधारू शकतो. मात्र, त्यांचा वापर भारतात बेकायदेशीर आहे. कारण बूस्टर जे स्पेक्ट्रम वापरतात आणि युजर्स त्यांच्यासाठी पैसे देत नाहीत. अवैध सिंगल बूस्टरच्या मदतीने तुमचे वायरलेस नेटवर्क कव्हरेज सुधारले जाऊ शकते.

​फोन रिस्टार्ट करा

फोन रिस्टार्ट करा: नेटवर्क नसल्यास फोन रीस्टार्ट करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे. संगणकाप्रमाणेच, तुम्ही स्मार्टफोन रीस्टार्ट करून नेटवर्क समस्येचे निराकरण करू शकता. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला पॉवर बटण जास्त वेळ दाबावे लागेल, त्यानंतर तुम्हाला रीस्टार्ट करण्याचा पर्याय मिळेल. तर आयफोन वापरकर्त्यांना होम बटण दाबावे लागेल. यानंतर तुम्हाला पॉवर स्लाइडर मिळेल, ज्याच्या मदतीने फोन बंद करावा लागेल आणि नंतर तो चालू करावा लागेल. नेटवर्क स्पीड कमी असल्यास फोन रिस्टार्ट केल्याने तुमचे काम होऊ शकते.

​एरोप्लेन मोड

एरोप्लेन मोड: नेटवर्क नीट नसेल तर कामात अनेक अडचणी येऊ शकतात. यावर उपाय स्वरूप तुम्ही एरोप्लेन मोड सुरु करू शकता. एरोप्लेन मोड हा एक सोपा आणि जलद पर्याय आहे. हा पर्याय काम करेल अशी ९९ टक्के शक्यता असते. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला क्विक सेटिंग्ज पॅनलवर जावे लागेल. येथे तुम्हाला एअरप्लेन मोड आयकॉन मिळेल. त्यावर क्लिक केल्याने, फोन ऑफलाइन मोडमध्ये जाईल आणि नंतर तो बंद करताच तुम्हाला एक चांगले नेटवर्क मिळेल. तर आयफोनमध्ये हा पर्याय तुम्हाला कंट्रोल सेंटरमध्ये मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here