बॅक टॅप फीचर

iPhone च्या बॅक पॅनेलवर असलेला Apple चा लोगो केवळ लूकसाठी नाही. या लोगोमध्ये बॅक टॅप फीचर दिले आहे, जे खूपच कामाचे आहे. iPhone Apple लोगोवरील सीक्रेट टॅप सर्विस अनेक कामे करू शकते. एकाचवेळी दोन अथवा तीन वेळा टॅप केल्यावर हे अॅक्टिव्ह होते. अॅप्स ओपन करणे, फोटो काढणे, टॉर्च चालू करणे, सिरी वॉइस असिस्टेंट अशी अनेक कामे याद्वारे शक्य आहेत. या फीचरचा वापर करण्यासाठी तुम्हाला आयफोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन अॅक्टिव्हेट करावे लागेल.
iPhone द्वारे करू शकता कागदपत्रं स्कॅन

iPhone च्या नोट्स अॅपद्वारे तुम्ही डॉक्यूमेंट्सला स्कॅन करू शकता. कागदपत्रं स्कॅन करण्यासाठी ही खूपच सोपी पद्धत आहे. हे कागदपत्रांमध्ये बदल करण्याची सुविधा देते. यात तुम्ही कलर फिल्टरचा देखील वापर करू शकता. तसेच, कागदपत्रं स्कॅन केल्यानंतर त्यांना पीडीएफ किंवा इमेज फॉर्मेटमध्ये देखील सेव्ह करू शकता. या डॉक्यूमेंट्सला फोनची मेमरी अथवा ऑनलाइन स्टोर जसे की आयक्लाउड ड्राइव्ह आणि गुगल ड्राइव्हरवर देखील सेव्ह करू शकता.
उंची मोजू शकता

अनेकांना माहिती नाही की आयफोनच्या मदतीने तुम्ही उंची देखील मोजू शकता. LiDAR सेंसर टेक्नोलॉजीच्या मदतीने तुम्ही सहज उंची मोजू शकता. उंची मोजण्यासाठी तुम्हाला iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max वर Measure अॅपला डाउनलोड करावे लागेल. तसेच, ज्या व्यक्तीची उंची मोजायची आहे ती व्यक्ती डोक्यापासून ते पायापर्यंत एकाच फ्रेममध्ये असणे गरजेचे आहे.
क्विक टायपिंगसाठी स्पेसबार कर्सर-

यासाठी तुम्हाला स्पेसबारला लाँग प्रेस करून कर्सरला टेक्स्टच्या मेन पार्टवर चारही बाजूला ओढायचे आहे. यामुळे फास्ट व अचूक एडिटिंगसाठी पूर्ण कीबोर्डला व्हर्च्यूअल ट्रॅकपॅडमध्ये बदलते.
आपल्या आवडत्या चॅटला करा पिन
तुम्ही वारंवार ज्या व्यक्तीशी बोलत आहात, त्याचे चॅट पिन करू शकता. यासाठी तुम्हाला थंबटॅक ग्लिफसह एक येलो मेन्यू आणावा लागेल. त्यानंतर मेसेज अॅपमध्ये चॅटवर उजवीकडे स्वाइप करावे लागेल. त्यानंतर चॅटला टॉपवर पिन करण्यासाठी ग्लिफवर टॅप करा. आता तुम्ही पिन केलेल्या चॅटला लाँग प्रेस करून कोठेही रिअरेंज करू शकता.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times