फेब्रुवारी २०२२ मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्सला भारतात लाँच केले आहे. मार्च महिन्यात देखील कंपन्या आपल्या लेटेस्ट स्मार्टफोन्सला लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही दिवस वाट पाहणे तुमच्या फायद्याचे ठरू शकते. जेणेकरून, लेटेस्ट फीचर्ससह लाँच झालेले स्मार्टफोन्स तुम्ही खरेदी करू शकता. Xiaomi ९ मार्चला भारतात आपल्या Redmi Note 11 Pro सीरिजला लाँच करण्याची शक्यता आहे. तसेच, Realme V25 देखील लाँच होण्याची शक्यता आहे. Apple आणि Google देखील आपल्या स्वस्त iPhone SE 3 आणि Pixel 6a ला सादर करू शकतात. नवीन आयफोनची किंमत खूपच कमी असण्याची शक्यता आहे. तसेच, सॅमसंग गॅलेक्सी एस३३ ५जी देखील या महिन्यात लाँच होऊ शकतो. मार्च महिन्यात लाँच होणाऱ्या या दमदार स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Apple iPhone SE 3

apple-iphone-se-3

Apple मार्च महिन्यात आपल्या स्प्रिंग २०२२ इंव्हेंटमध्ये स्वस्त आयफोन एसई ३ आणि अन्य गॅजेट्सला लाँच करण्याची शक्यता आहे. हा Phone SE 2020 चा सक्सेसर असेल. तसेच, हा कंपनीचा सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट आयफोन असण्याची शक्यता आहे. नवीन आयफोन आकर्षक लुकसह येईल. याआधी iPhone SE 2020 ला भारतात ४२,५०० रुपयात लाँच केले होते. काही रिपोर्टनुसार, नवीन iPhone SE 3 ची किंमत जवळपास २५ हजार रुपये असू शकते.

Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+

redmi-note-11-pro-redmi-note-11-pro

Xiaomi ने माहिती दिली आहे की, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro+ या लेटेस्ट स्मार्टफोन्सला ९ मार्चला भारतात लाँच करेल. या स्मार्टफोन्सला काही दिवसांपूर्वीच जागतिक बाजारात लाँच केले आहे. त्यामुळे फीचर्सची माहिती समोर आलेली आहे. या फोन्समध्ये ५जी स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट दिला जाईल. तसेच, नियमित मॉडेलमध्ये डेप्थ सेंसर मिळेल, तर प्लस व्हेरिएंटमध्ये दिले जाणार नाही. दोन्ही फोन्समध्ये इतर फीचर्स समान मिळण्याची शक्यता आहे.

Google Pixel 6a

google-pixel-6a

Google मार्चमध्ये स्वस्त पिक्सल ए सीरिज स्मार्टफोनला लाँच करू शकते. कंपनी भारतात Pixel 5a चा सक्सेसर Pixel 6a ला देखील लाँच करेल. याआधी कंपनीचा भारतातील शेवटचा फोन Pixel 4a हा होता.

Samsung Galaxy M33

सॅमसंग भारतात Galaxy M33 मिड-रेंज स्मार्टफोनला लवकरच लाँच करू शकते. यामध्ये Exynos १२०० चिपसेट आणि माली जी६८ जीपीयू मिळू शकतो. यात २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळू शकते.

Realme V25

realme-v25

Realme आपला नवीन स्मार्टफोन Realme V25 ला ३ मार्चला चीनमध्ये लाँच करू शकते. मात्र, कंपनीने अद्याप फोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत खुलासा केलेला नाही. या फोनमध्ये ६.६ इंच डिस्प्ले दिला जाईल. यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट, ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळू शकते. हा फोन अँड्राइड १२ आधारित आउट ऑफ द बॉक्सवर काम करेल. यात ६४ मेगापिक्सल मुख्य कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here