करोनावर मात करण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने कडक अंमलबजावणी करायला सुरुवात केली आहे. करोनाची भीती सगळीकडे पसरली असताना सध्या सोशल मीडियावर दोन इमोजी व्हायरल झाले आहेत. या दोन इमोजीमध्ये एक व्हायरस आणि मेडिकल मास्क फेस घातलेला इमोजी आहे. हे दोन्ही ठरल्याची माहिती emojipedia ने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिली आहे. या दोन इमोजी शिवाय नमस्कार करणारा इमोजी सुद्धा खूप व्हायरल होत आहे. तर सर्वात जास्त वापरला जाणारा इमोजी म्हणून इटलीचा झेंडा आणि इशारा देणारा इमोजी सोशलवर हिट ठरले आहेत.
डेटा काढण्यासाठी इमोजीपीडियाने दोन लाख ट्विट्सवर रिसर्च केले आहे. त्यानंतर या इमोजीची यादी बनवण्यात आली आहे. यात टॉप १२ इमोजीचा समावेश करण्यात आला आहे. ज्यात मास्कचा चेहरा, एक क्रूर चेहरा, उल्टी करणारा चेहरा, शिंकणारा चेहरा, थर्मामीटरचा चेहरा, हेड-बँडेजचा चेहरा, अॅम्ब्यूलन्स, टॅबलेट, सिरिंज, मायक्रोब (जंतू), साबण आणि स्पंज यांचा समावेश आहे. या सर्व इमोजीचा कधी ना कधी वापर ४९ हजार २६१ ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
मास्क फेसचा इमोजी ३५.८२ टक्के, नाक वाहणारा ५.०७, क्रूर चेहरा ५.३८ टक्के, साबणचा ३.६७ टक्के, उलटी करणारा चेहरा २.८५ टक्के, अॅम्ब्यूलन्स, डोकेदुखी, टॅबलेट आणि सिरिंजचा २.३७ टक्के आणि ४२.९ टक्के लोकांनी व्हायरस इमोजीचा वापर केला आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times