जगभरात पबजी २४ तास बंद राहणार असल्याची माहिती कंपनीने स्वतः युजर्संना नोटिफिकेशन पाठवून दिली आहे. त्यामुळे पबजीच्या चाहत्यांना २४ तास पबजी गेम खेळता येणार नाही. पबजीची ही माहिती आपल्या युजर्संना कळावी यासाठी कंपनीकडून युजर्संना ‘Temporary Suspension of Service’ असे नोटिफिकेशन पाठवले जात आहे. पबजी २४ तास बंद करण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीचा हा निर्णय घेण्यामागेही आहे. सध्या करोना व्हायरसमुळे जगभरात भीती पसरली आहे. जगभरात हजारो जणांचा बळी गेला आहे. तर लाखो लोकांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनमध्ये एका शहरात आलेला करोना व्हायरस आज जगाच्या अनेक काना कोपऱ्यात पोहोचला आहे. करोना विरुद्ध लढण्यासाठी सर्वच स्तरांतून प्रयत्न केले जात आहे.
चीनमध्ये करोना व्हायरससारख्या महामारी विरुद्ध लढताना अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्या लोकांना आदरांजली वाहता यावी यासाठी पबजी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. भारतात पबजीचे शटडाऊन होणार की नाही, यासंबंधी कंपनीने अद्याप काहीही माहिती दिली नाही. करोना व्हायरस विरुद्ध लढताना जे लोक शहीद झाले आहेत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आज मध्यरात्री १२ वाजेपासून उद्या रात्री १२ पर्यंत पबजीचे शटडाऊन असणार आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times