होळीचा सण अगदी काही दिवसांवर आला आहे. रंगाचा उत्सव असलेला हा सण प्रत्येक ठिकाणी वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते. लहान मुले असो वा प्रौढ, प्रत्येकाला रंग आणि पाण्याने होळी खेळायला आवडते. असा हा जल्लोषाचा सण, ज्यात सगळं विसरून प्रत्येकाला रंगात रंगायचं असतं. पण, अनेकदा, या मौज-मजेत लोक त्यांच्या सोबत असलेल्या फोनची काळजी घेणे विसरतात. त्यामुळे फोनमध्ये पाणी जाते किंवा फोन रंगामुळे खराब होतो. तुमचा मौल्यवान फोन सुरक्षित राहावा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या नुकसानाला सामोरे जावे लागू नये अशी तुमची इच्छा असेल, तर आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगत आहोत. ज्यामुळे तुम्ही होळीच्या रंगापासून तुमच्या स्मार्टफोनला सेफ ठेवू शकाल. जाणून घ्या या भन्नाट टिप्स आणि तुमच्या स्मार्टफोनला ठेवा सेफ.

​फोनमध्ये पाणी गेल्यास कॉल रिसिव्ह करू नका

फोनमध्ये पाणी गेल्यास कॉल रिसिव्ह करू नका: काही कारणाने फोनमध्ये पाणी गेल्यास कॉल रिसिव्ह करू नका आणि कॉल डायल करू नका. असे करण्याचा प्रयत्न केल्याने तुमच्या फोनमध्ये स्पार्किंग होऊ शकते. फोनमध्ये पाणी गेले असेल तर फोन बंद करा आणि बॅटरी काढा आणि स्वच्छ सुती कापडाने पुसून टाका. यासाठी तुम्ही एक एक घरगुती उपाय देखील वापरू शकता. फोन पुसल्यानंतर तो तांदळाच्या डब्याच्या मधोमध ठेवा. १२ तासांनंतर फोन बाहेर काढा. यामुळे फोनमधील ओलावा नाहीसा होईल.

​इअरफोन-ब्लूटूथ सोबत कॅरी करा

इअरफोन किंवा ब्लूटूथ नक्कीच सोबत कॅरी करा : होळीच्या दिवशी फोन घेऊन बाहेर जात असाल तर इअरफोन किंवा ब्लूटूथ नक्कीच सोबत घ्या. यामुळे तुम्हाला फोनवर बोलणे सोपे होईल. खूपच महत्वाचे काम असल्यास होळी खेळतानाही तुम्हाला तुमचा फोन सोबत ठेवायचा असेल तर त्यासाठी झिप पाउच वापर करा. असेल केल्यास तुमचे महत्वाचे कॉल्स देखील मिस होणार नाही आणि फोन देखील खराब नाही. तसेच, होळीच्या दिवशी तुमचे हात आणि तुम्ही रंगांनी ओले असतात. अशा वेळी अनेकवेळा आपण ओल्या हातांनी फोन पकडला जातो. अशात हात कोरडे केल्यानंतरच फोन वापरा.

​स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा

स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा: जर तुम्हाला एखादा महत्वाचा फोन आला किंवा कोणाला फोन करायचा असेल आणि रंग खेळून तुमचे डोके ओले झाले असेल तर फोन करताना स्पीकरवर बोलण्याचा प्रयत्न करा. तुमच्या डोक्यातील पाणी मोबाईल फोनमध्ये गेले तर फोन बंद होऊ शकतो आणि खराब देखील होऊ शकतो. अनेक खेळत असतांना अगदी भान विसरून रंग खेळतात. अशात, खिशात किंवा हातात असलेल्या स्मार्टफोनकडे त्यांचे लक्ष देखील जात नाही. पण, होळी खेळतांना या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

​वॉटरप्रूफ कव्हरचा वापर करा

वॉटरप्रूफ कव्हरचा वापर करा: होळीच्या दिवशी रंग आणि पाण्यापासून मोबाईलचे संरक्षण कसे करावे हे टेन्शन युजर्सना असते. होईल भारतात मोठ्या उत्साहात करण्यात येते. विविध ठिकाणी हा सण वेग-वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी कोण तुम्हाला रंगांनी कधी भिजवते हे कळत सुद्धा नाही. त्यामुळे होळीच्या दिवशी तुमचा फोन बाजारात उपलब्ध असलेल्या वॉटरप्रूफ कव्हरमध्ये ठेवा. वॉटरप्रूफ कव्हर पाण्यापासून तुमच्या फोनचे योग्य प्रकारे संरक्षण करेल आणि फोन खराब देखील होणार नाही.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here