तुम्ही जर नवीन वॅक्यूम क्लिनर, प्यूरीफायर, सिक्योरिटी कॅमेरा सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे खास संधी आहे. टेक कंपनी Xiaomi भारतात “स्मार्ट होम डेज” सेल सुरू करणार आहे. या सेलमध्ये कंपनीच्या एलईडी बल्ब, राउटर, प्यूरिफायर आणि इतर प्रोडक्ट्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. Mi स्मार्ट होम डेज सेल ७ मार्चपासून सुरू होणार आहे. १० मार्च २०२२ पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये तुम्ही अनेक प्रोडक्ट्सला स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये मिळणाऱ्या ऑफरचा लाभ Mi.com, Mi Home, Flipkart, Amazon सह अन्य ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर देखील मिळेल. Xiaomi स्मार्ट होम डेज सेलमध्ये प्रोडक्ट्सवर वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा मिळेल. सेलमध्ये स्वस्तात मिळणाऱ्या Xiaomi च्या स्मार्ट होम प्रोडक्ट्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​वॅक्यूम क्लिनर आणि प्यूरीफायरवर आकर्षक ऑफर

या सेलमध्ये Xiaomi ने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या Mi रोबोट वॅक्यूम-मॉप पी ला स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये हे स्मार्ट होम क्लिनिंग डिव्हाइस फक्त १९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. या प्रोडक्टवर ५ हजार रुपये डिस्काउंट मिळेल.

सेलमध्ये शाओमीचे दोन प्यूरीफायर देखील स्वस्तात उपलब्ध होतील. Mi Air Purifier 3 ला १ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर ९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Xiaomi चे Mi स्मार्ट वाटर प्यूरीफायर (RO+UV) हे २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर १०,९९९ रुपयात उपलब्ध होईल.

​सिक्योरिटी कॅमेरा आणि एलईडी बल्बवर डिस्काउंट

Xiaomi सेलमध्ये होम सिक्योरिटी कॅमेऱ्यावर देखील सूट देत आहे. Mi 360 होम सिक्योरिटी कॅमेरा २K प्रो ला ३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर Mi होम सिक्योरिटी कॅमेरा ३६० १०८०p ला २०० रुपये डिस्काउंटनंतर २,७९९ रुपयात खरेदी करता येईल.

Mi स्मार्ट होम डेज सेलमध्ये शाओमीच्या एलईडी बल्बच्या एका सीरिजवर देखील मोठी सूट मिळत आहे. पांढऱ्या व रंगीत प्रकाशासह येणाऱ्या Mi LED स्मार्ट बल्बची किंमत १,२९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही फक्त ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तसेच, १०१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर एक बल्ब ३९९ रुपयात उपलब्ध होईल.

​स्मार्ट कलर बल्ब आणि राउटरवर आकर्षक ऑफर्स

Mi LED स्मार्ट कलर बल्ब (B22) वर १०० रुपयांची सूट मिळेल. डिस्काउंटनंतर ७९९ रुपयांच्या या बल्बला तुम्ही फक्त ६९९ रुपयात खरेदी करू शकता. कंपनीच्या Mi स्मार्ट एलईडी डेस्क लॅम्प1S आणि Mi स्मार्ट बेडसाइड लॅम्प 2 या दोन स्मार्ट लॅम्पवर ४०० रुपये डिस्काउंट मिळेल. त्यानंतर सेलमध्ये फक्त २,४९९ रुपयात खरेदी करू शकता.

तुम्ही या सेलमध्ये Mi राउटर 4A गिगाबिट व्हर्जनला फक्त १,८९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर ३०० रुपये सूट मिळत आहे.

​आकर्षक ऑफर्सचा फायदा

या सेलमध्ये प्रोडक्ट्सवर आकर्षक ऑफर्सचा देखील लाभ मिळेल. रिवॉर्ड Mi सह कूपनचा फायदा मिळेल. याशिवाय, Mi.com वरून खरेदी करताना अतिरिक्त एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. तसेच, Xiaomi India वर WipeOutSale देखील सुरू आहे. या सेलमध्ये दररोज वेगवेगळ्या डिव्हाइसवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळत आहे. दरम्यान, ७ मार्चपासून सुरू होणार Mi स्मार्ट होम डेज सेल १० मार्चपर्यंत चालणार आहे. सेलमध्ये तुम्ही अनेक प्रोडक्ट्सला स्वस्तात खरेदी करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here