Amazon on OnePlus 9 Pro 5G :  होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे. अशा वेळी छान फोटो क्लिक करण्यासाठी, सेल्फी काढण्यासाठी तुम्ही जर नवीन मोबाईलच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अॅमेझॉनवर (Amazon) सध्या OnePlus 9 Pro 5G या मोबाईलवर सर्वोत्तम ऑफर सुरु आहे. या मोबाईलवर तुम्हाला 13 हजारांपर्यंत सूटदेखील मिळणार आहे. एवढंच नाही तर, अलेक्सा, 5G नेटवर्क, या मोबाईलच्या इतर फीचर्ससह उच्च दर्जाचा 50MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे. 

OnePlus 9 Pro 5G (पाईन ग्रीन, 8GB RAM, 128GB स्टोरेज)

या मोबाईलमध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरासह Hasselblad ने डेव्हलप केलेला आहे. यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. अतिशय सुंदर नैसर्गिक फोटो या कॅमेऱ्यात येतात. या मोबाईलमध्ये अनेक व्हिडिओ देखील बनवता येतात. हॅसलब्लॅड ही स्वीडिश कंपनी आहे जी कॅमेरे आणि फोटोग्राफी उपकरणे बनवते. यात 1/1.56″ आकाराचे सेन्सर तसेच 8 एमपी टेलीपोटो लेन्स आहेत. 2 MP मोनोक्रोम कॅमेरा आणि 16 MP सेल्फी कॅमेरा आहे. आयफोन आणि सॅमसंगला टक्कर देणाऱ्या या मोबाईलला सिल्व्हर, ग्रीन आणि ब्लॅक कलरचा पर्याय मिळत आहे.

मोबाईलची किंमत आणि ऑफर :

या मोबाईलची किंमत 64,999 आहे. SBI कार्डने फोन पेमेंटवर 8 हजारांची झटपट सूट दिली जात आहे. हा मोबाईल खरेदी करण्यावर 5 चे कूपन डिस्काउंट आहे. या दोन्ही ऑफरमध्ये 17,900 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आहे, नो कॉस्ट EMI चा पर्याय देखील आहे.

OnePlus 9 Pro 5G मध्ये विशेष काय आहे ?

  • या मोबाईलमध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. तसेच त्याचे खास फिचर अलेक्सामध्ये तयार करण्यात आले आहे.
  • या मोबाईलमध्ये Adreno 660 GPU सह Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसर आहे.
  • मोबाईलची स्क्रीन फ्लुइड AMOLED डिस्प्लेसह 6.7 इंच आहे आणि त्यात नवीनतम LTPO तंत्रज्ञान आहे.
  • मोबाईलमध्ये Android 11 आधारित ऑक्सिजन ऑपरेटिंग सिस्टम आणि 4500 mAh बॅटरी 65W जलद चार्जिंग तसेच 50W वायरलेस चार्जिंग क्षमता आहे.

टीप : ही सर्व माहिती केवळ Amazon च्या वेबसाइटवरून घेतली गेली आहे. वस्तूंशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्हाला Amazon वर जाऊन संपर्क साधावा लागेल. एबीपी न्यूज येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफर याची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

technology

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here