जिओचा २४९ रुपये आणि २९९ रुपयांचा प्लान

जिओकडे २३ आणि २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे दोन प्लान्स आहे. कंपनीच्या २४९ रुपयांच्या प्लानची वैधता २३ दिवस असून, यात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. याशिवाय जिओ अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळेल. कंपनीचा २९९ रुपयांचा प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये देखील अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ सिक्योरिटी आणि जिओ क्लाउड या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
एअरटेलचा ३५९ रुपयांचा प्लान

एअरटेलचा ३५९ रुपयांचा प्रीपेड प्लान २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यात यूजर्सला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस आणि दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळेल. याशिवाय अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचा मोफत अॅक्सेस मिळतो. तसेच, Xstream Mobile Pack चा देखील फायदा मिळतो. या अंतर्गत २८ दिवस सोनी लिव्ह, Lionsgateplay, ErosNow, Haichai, ManormaMAX चा अॅक्सेस मिळेल. यासोबतच, एअरटेलच्या या पॅकमध्ये फास्टॅगवर १०० रुपये कॅशबॅक, विंग म्यूझिक अॅप आणि फ्री हॅलो ट्यूनचा देखील फायदा मिळतो.
वोडाफोन आयडियाचा ३५९ रुपयांचा प्लान

वोडाफोन आयडियाकडे एअरटेलप्रमाणेच २५९ रुपयांचा प्रीपेड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये ग्राहकांना अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. प्लानमध्ये यूजर्सला Vi movies and TV चा मोफत अॅक्सेस मिळतो. याशिवाय बिंज ऑल नाइटची सुविधा मिळते. म्हणजेच, रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकता. प्लानमध्ये वीकेंड डेटा रोलओव्हरची देखील सुविधा दिली आहे.
BSNL चा ३९७ रुपयांचा प्लान

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी शानदार प्लान्स आणत असते. कंपनीकडे देखील ३९७ रुपयांचा प्लान असून, यात तब्बल २०० दिवसांची वैधता मिळत आहे. याशिवाय, दररोज १ जीबी डेटा आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीकडे १९७ रुपयांचा देखील प्लान असून, यात १०० दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि १८ दिवस दररोज २ जीबी डेटाचा फायदा मिळेल. तसेच, BSNL च्या प्लानमध्ये इतर कंपन्यांप्रमाणे ओटीटी अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मात्र मिळत नाही.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times