आज इंटरनेटशिवाय अनेक कामे करणे अशक्य आहे. स्मार्टफोन वापरत असाल तर त्यासाठी इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचेच आहे. याशिवाय, तुम्ही जर घरून काम करत असाल अथवा ऑनलाइन क्लासेस सुरू असल्यास फास्ट इंटरनेटची गरज भासते. टेलिकॉम कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी अनेक शानदार प्लान्स सादर करत आहेत. मात्र, तुम्हाला जर फास्ट इंटरनेट स्पीड हवा असल्यास ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याशिवाय काहीही पर्याय नाही. टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि बीएसएनएल आपल्या ग्राहकांना शानदार ब्रॉडबँड प्लान्स उपलब्ध करत आहेत. १ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये हाय-स्पीड डेटाचा फायदा मिळतो. याशिवाय, या ब्रॉडबँड प्लान्समध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील मिळतील. यातील काही प्लान्स ओटीटी सबस्क्रिप्शनसह येतो. प्लान्समध्येच ओटीटी बेनिफिट्स मिळत असल्याने अतिरिक्त पैसे खर्च करावे लागत नाहीत. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​जिओचा ९९९ रुपयांचा प्लान

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ स्वस्त प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्सची मोठी लिस्ट आहे. मात्र, कंपनी आपल्या ग्राहकांना स्वस्त ब्रॉडबँड प्लान देखील उपलब्ध करत आहे. कंपनीकडे ९९९ रुपये किंमतीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये १५० एमबीपीएसच्या स्पीडने डेटा वापरू शकता. प्लानमध्ये एकूण ३,३०० जीबी म्हणजेच ३.३ टीबी डेटा मिळेल. या प्लानमध्ये १५ पेक्षा अधिक ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यूजर्सला अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिज्नी+ हॉटस्टार आणि एरॉस नाऊसह अनेक अ‍ॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळेल.

​Airtel चा ९९९ रुपयांचा प्लान

airtel-

टेलिकॉम कंपनी Airtel कडे देखील जिओप्रमाणे ९९९ रुपये किंमतीचा स्वस्त ब्रॉडबँड प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये यूजर्सला २०० Mbps चा डाउनलोडिंग स्पीड मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३.३ टीबी म्हणजे ३,३०० जीबी इंटरनेट डेटा दिला जाईल. Airtel च्या या ब्रॉडबँड प्लानमध्ये तुम्हाला अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळेल. हा प्लान ओटीटी बेनिफिट्ससह येतो. प्लानमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन दिले जात आहे. सोबतच, विंग म्यूझिकचा अ‍ॅक्सेस देखील मिळतो.

​BSNL चा ब्रॉडबँड प्लान

bsnl-

सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL देखील आपल्या ग्राहकांना कमी किंमतीत येणारा शानदार ब्रॉडबँड प्लान ऑफर करत आहे. कंपनीकडे जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत कमी किंमतीत येणारा प्लान आहे. BSNL कडे ७४९ रुपये किंमतीचा प्लान असून, यात यूजर्स १०० Mbps च्या स्पीडने डेटा वापरू शकतात. प्लानमध्ये एकूण १ टीबी म्हणजेच १००० जीबी डेटाचा फायदा मिळेल. हा डेटा समाप्त झाल्यानंतर यूजर्स ५ एमबीपीएसच्या स्पीडने इंटरनेट वापरू शकतात.

​Netplus चा ब्रॉडबँड प्लान

netplus-

जिओ, एअरटेल आणि बीएसएनएलला Netplus ही कंपनी जोरदार टक्कर देत आहे. Netplus कडे फक्त ९९९ रुपये किंमतीत येणारा शानदार प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये इतर कंपन्यांच्या तुलनेत जास्त फायदे मिळत आहे. या ब्रॉडबँड प्लानमध्ये यूजर्स २०० एमबीपीएसच्या स्पीडने नेट वापरू शकता. या प्लानमध्ये यूजर्सला अनलिमिटेड डेटाचा फायदा मिळतो. या प्लानमध्ये यूजर्सला कॉलिंग बेनिफिट्सचा देखील फायदा मिळतो. याशिवाय, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, झी५ प्रीमियम, वूट सिलेक्ट आणि एरॉस नाऊचे बंडल्ड सबस्क्रिप्शन मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here