Google Doodle celebrates Womens Day 2022: Google Doodle: जागतिक महिला दिनानिमित्त गुगलचं खास डुडल – google doodle celebrates international womens day 2022
नवी दिल्ली: केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगातील स्त्री शक्तीला सलाम करणारा, प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन, International Women’s Day 2022 आज सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ठिक-ठिकाणी विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्च इंजिन Google नेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल बनवून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.
मुंबईकरांनो सावधान! पुन्हा येऊ शकतं चक्रीवादळाचं संकट; समुद्रात होतायेत हालचाली वेग-वेगळ्या दिनाचे आणि महत्वाच्या घटनांचे महत्व अधोरेखित करणारे Google Doodle कायमच आकर्षक असतात. महिला दिनानिमित्त गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील विविध संस्कृती दिसू लागतात. तसेच, त्या संस्कृतीमधील स्त्रीया आपलं काम कसं करतात याबाबत माहिती देण्यात आली आहे. या डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. या प्रेरणादायक व्हिडीओमध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला आहे.
Marathi Joke: लॉटरी लागली तर बायको काय करेल? जागतिक महिला दिनानिमित्त एअर इंडियाने हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. त्यांना महिला दिनाची खास भेट दिली आहे. आज जागतिक महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.