भारतात स्वस्त फोन खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. बजेट सेगमेंटमध्येही बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक रेंज आणि विविध फीचर्ससह उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोन्सपैकी योग्य फोन निवडणे नक्कीच सोप्पे नाही. तुम्हालाही बजेटला धक्का न लावता स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहे. अनेक नामांकित कंपन्या कमी किमतीत बेस्ट फीचर्स असणारे फोन्स ग्राहकांसाठी ऑफर करतात. तुम्हाला जर असेच भन्नाट डिव्हाइस खरेदी करायचे असेल तर, आज आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम स्मार्टफोनची लिस्ट घेऊन आलो आहोत. या लिस्टमधील स्मार्टफोन्सची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तुम्ही एखाद्याला फोन गिफ्ट करू इच्छित असाल तर, हे स्मार्टफोन्स तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतात. यामध्ये Xiaomi Redmi 9A, JioPhone Next , Realme C11 सारख्या काही भन्नाट फोन्सचा समावेश आहे

​Realme Narzo 50i

realme-narzo-50i

Realme Narzo 50i : किंमत ७,४९९ रुपये: या डिव्हाइसमध्ये ६.५ -इंचाचा HD+ (१६०० x ७२० पिक्सेल) डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १.६ GHz ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर आहे. कमी बजेट असणाऱ्यांसाठी हा देखील एक चांगला पर्याय आहे. Realme Narzo 50i मध्ये ३२ GB स्टोरेजसह २ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेजसह ४ GB रॅम आहे. या फोनचा कॅमेरा जबरदस्त असून यात ८ MP रियर कॅमेरा, ५ MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, फोनला अधिक पॉवर देण्यासाठी Realme Narzo 50i मध्ये ५,००० mAh बॅटरी आहे.

Tecno Spark 8C

tecno-spark-8c

Tecno Spark 8C: (किंमत ७,४९९ रुपये ): या फोनमध्ये ९० Hz रिफ्रेश रेटसह ६.६ -इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. Tecno Spark 8C मध्ये १.६ GHz octa core Unisoc T606 प्रोसेसर आहे . तसेच, ३ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज या फोनमध्ये युजर्सला मिळेल. Spark 8C मध्ये फोटोग्राफीसाठी १३ MP+ सेकंडरी AI लेन्स आणि ८ MP फ्रंट-फेसिंग कॅमेरासह Rear कॅमेरा मिळतो. याशिवाय, ५,००० mAh क्षमतेची मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही या फोनचा नक्कीच विचार करू शकता.

JioPhone Next

jiophone-next

JioPhone Next (६,४९९ रुपये ): JioPhone Next फोनमध्ये ५.४५ -इंचाचा HD+ डिस्प्ले आणि क्वाड-कोर स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसर आहे. फोनमध्ये २ GB रॅम, ३२ GB स्टोरेज देण्यात आले आहे. या ड्युअल सिम फोनमध्ये जिओवर एक सिम लॉक आहे. फोनमध्ये १३ MP ऑटोफोकस रिअर कॅमेरा, ८ MP ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा आणि ३,५०० mAh बॅटरी आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी JioPhone Next फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन २१० प्रोसेसर आणि प्रगती ओएस दिले आहे.

Realme C11

realme-c11

Realme C11: किंमत ७,४९९ रुपये: जर तुम्हाला ड्युअल रियर कॅमेरे असलेला फोन हवा असेल तर, Realme C11 तुमच्यासाठी बेस्ट पर्याय असेल. फोनमध्ये ६.५२ -इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३+ संरक्षणासह येतो. Realme C11 Octa core MediaTek Helio G35 प्रोसेसरसह येतो. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी यात मस्त कॅमेरा देखील आहे. Realme C11 १३ MP + २ MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, या स्मार्टफोनमध्ये ५ MP फ्रंट-फेसिंग कॅमेरा आणि ५,००० mAh बॅटरी आहे.

Redmi 9A

redmi-9a

Xiaomi Redmi 9A: किंमत- ६,९९९ रुपये: १० हजारांखालील बजेटमध्ये Xiaomi Redmi 9A हा एक उत्तम पर्याय आहे. फोनमध्ये ६.५३ -इंचाचा HD+ डिस्प्ले आणि MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. Xiaomi Redmi 9A मध्ये २GB / 3 GB रॅमसह ३२ GB स्टोरेज प्रदान करण्यात आले आहे. फोनमध्ये LED फ्लॅशसह १३ MP रियर कॅमेरा देण्यात आला असून Xiaomi Redmi 9A मध्ये आणि ५ MP फ्रंट कॅमेरा आहे. याशिवाय, फोनला पॉवर देण्यासाठी ५००० mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here