घरात एखादे गॅझेट खरेदी करायचे असेल किंवा नवा कोरा स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर प्रत्येक जण सेलची वाट बघत असतो. आजकाल ई-कॉमर्स वेबसाईट्सवर सर्व वस्तू मोठ्या डिस्काउंटसह कमी किमतीत विकल्या जातात. ज्याचा फायदा ग्राहकांना होतो. या सेलमध्ये ग्राहकांची बचत होते. तुम्हीच अशाच सेलची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलसह परत येत आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल १२ मार्चपासून सुरू होईल आणि १७ मार्चपर्यंत चालेल. फ्लिपकार्ट प्लस सदस्य ११ मार्चपासून या सेलचा लाभ घेऊ शकतील. या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोनवर अनेक डीलचे फायदे मिळतील. Motorola या सेलमध्ये बजेट तसेच प्रीमियम स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देत आहे. स्मार्टफोन्सवर ऑफर्सचा किती फायदा तुम्हाला मिळू शकतो जाणून घ्या.

Motorola Edge 30 Pro

motorola-edge-30-pro

Motorola Edge 30 Pro ची किंमत ५५,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर फोन ४९,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकते. यासोबतच वरील ऑफर्सही देण्यात येणार आहेत. ड्यूल सिम (नॅनो) सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड १२ वर काम करतो. यामध्ये ६.७ इंच फुल एचडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९, रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि डीसीआय-पी ३ कलर आहे.डिस्प्लेला २.५डी कर्व्ड कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ सह अँटी-फिंगरप्रिंट कोटिंग आहे. यात स्नॅपड्रॅगन ८ झेन १ SoC सह ८ जीबी LPDDR५ रॅम मिळते.

Motorola Moto E7 Plus

motorola-moto-e7-plus

Motorola Moto E7 Plus ची मूळ किंमत १२,९९९ आहे. परंतु, सेलमध्ये तुम्ही फोन ९,४९९ रुपयांना डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. यासोबत, ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करून दिल्या जातील. Motorola Edge 20 Fusion: Motorola Edge 20 Fusio ची मूळ किंमत २५,९९९ रुपये आहे. परंतु, डिस्काउंटनंतर तुम्ही हा फोन २३,०९९ रुपयांना खरेदी करू शकता. युजर्सना या फोनवर EMI आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. हे डिव्हाइस ड्युअल-सिमला सपोर्ट करते. फोन Android ११ आधारित MyUX ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Moto G 60

moto-g-60

Moto G60 ची मूळ किंमत १७,९९९ आहे. परंतु , डिस्काउंटनंतर फोन १५,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनसोबत ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या फोनवर देण्यात येणाऱ्या सवलती Sale च्या दिवशीच कळतील. MotoG 60 मध्ये मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये तुम्हाला १०८ MP चा प्रायमरी कॅमेरा मिळेल. याशिवाय, ८ MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ MP मॅक्रो कॅमेरा देखील मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ MP कॅमेरा देण्यात आला आहे.

Motorola Edge 20

motorola-edge-20

Motorola Edge 20 ची खरी किंमत २९,९९९ रुपये आहे. परंतु,फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेल डिस्काउंटनंतर तुम्ही तो २५,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, बँक ऑफरनंतर, त्याची प्रभावी किंमत २५,२४९ रुपयांपर्यंत खाली येते. यासोबतच, Motorola Edge 20 वर ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरही उपलब्ध करून दिल्या जातील. फोनमध्ये ६.७ इंच फुलएचडी+ ओलेड मॅक्स व्हिजन डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७७८जी प्रोसेसर आणि ८ जीबी रॅम मिळेल. फोन अँड्राइड ११ आधारित MyUX स्किन वर काम करतो

Motorola Edge 20 Pro

motorola-edge-20-pro

Motorola Edge 20 Pro ची मूळ किंमत ३६,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल सवलतीनंतर हा स्मार्टफोन ३२,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. तर, दुसरीकडे, बँक ऑफर नंतर, त्याची प्रभावी किंमत ३२, २४९ रुपयांपर्यंत घसरते. विक्रीची उत्पादने ११ मार्च रोजी फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना सवलतीत उपलब्ध करून दिली जातील. कमी किमतीत चांगला फोन खरेदी करायचा असल्यास तुम्ही Motorola Edge 20 Pro चा विचार नक्कीच करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here