आज स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे सहज शक्य होतात. विशेष म्हणजे कंपन्या खूपच कमी किंमतीत स्मार्टफोन लाँच करत असल्याने ग्राहकांकडून देखील मोठी पसंती मिळते. परंतु, स्मार्टफोनचा काळ असतानाही फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या कमी नाही. अद्यापही भारतात फीचर फोन वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने फीचर फोनचा वापर केला जातो. तर काहीजण स्मार्टफोनसोबतच आणखी एक डिव्हाइस म्हणून फीचर फोनला प्राधान्य देतात. बाजारात अनेक कंपन्या कमी किंमतीत Feature Mobile Phone सादर करत आहेत. परंतु, प्रामुख्याने सॅमसंग (Samsung) आणि नोकियाच्या (Nokia) फीचर फोनला ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे. तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Samsung चे अनेक शानदार Feature Phone स्वस्तात मिळतील. या फोन्सची किंमत अडीच हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Samsung Guru Music 2

samsung-guru-music-2

Samsung Guru Music 2 फीचर फोनला अ‍ॅमेझॉनवरून सर्वाधिक खरेदी केले जाते. तुम्ही देखील अनेकजणांकडे हा फोन पाहिला असेल. अ‍ॅमेझॉनवर या फोनला ३९ हजारांपेक्षा अधिक यूजर्सने ४.२ स्टार रेटिंग दिली आहे. Samsung Guru Music 2 फीचर फोनची मूळ किंतम ३,९९९ रुपये आहे. परंतु, ४५ टक्के म्हणजेच १,८१९ रुपयांच्या डिस्काउंटनंतर या फोनला तुम्ही फक्त २,१८० रुपयात खरेदी करू शकता. हा फीचर फोन ब्लॅक कलरमध्ये येतो.

​SAMSUNG GURU MUSIC2 (SM315) (SM-315) (Black) फीचर फोन

samsung-guru-music2-sm315-sm-315-black-

GURU MUSIC2 (SM315) (SM-315) फीचर फोन देखील अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात उपलब्ध आहे. या फीचर फोनची मूळ किंमत २,४९९ रुपये आहे. परंतु, २० टक्के म्हणजेच ५०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. हा फोन देखील ब्लॅक कलरमध्ये येतो. SAMSUNG च्या या फोनमध्ये २ इंचाचा डिस्प्ले दिला असून, यात ८०० एमएएचची बॅटरी मिळते. तसेच, ३६ एमबी रॅम देखील फोनमध्ये दिली आहे.

​Samsung Guru 1200

samsung-guru-1200

Samsung Guru 1200 या स्मार्टफोनला देखील ग्राहकांकडून पसंती मिळते. या फोनची मूळ किंमत २,०९९ रुपये आहे. परंतु, २२ टक्के म्हणजेच ४५७ रुपयांच्या डिस्काउंटनंतर फोनला फक्त १,६४२ रुपयात तुम्ही खरेदी करू शकता. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर या फोनला ३१ हजारांपेक्षा अधिक यूजर्सने ४.१ स्टार रेटिंग दिली आहे. या फोनला तुम्ही ब्लॅक कलरमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये १.५२ इंच टीएफटी स्क्रीन दिली असून, याचे रिझॉल्यूशन १२८x१२८ पिक्सल आहे. यात ८०० एमएएचची दमदार बॅटरी मिळते.

​SAMSUNG GURU MUSIC2 (SM315) (SM-315) (Gold)

samsung-guru-music2-sm315-sm-315-gold

SAMSUNG GURU MUSIC2 (SM315) (SM-315) (Gold) फीचर फोन अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत २,४९९ रुपये आहे. मात्र, अ‍ॅमेझॉनवरून ४ टक्के म्हणजेच १०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त २,३९९ रुपयात खरेदी करता येईल. सॅमसंगचा हा फोन फोन गोल्ड कलरमध्ये येतो. यात देखील २ इंचाचा शानदार डिस्प्ले दिला असून, पॉवरसाठी ८०० एमएएचची बॅटरी मिळते. सिंगल चार्जमध्ये तुम्ही फोनला दिवसभर सहज वापरू शकता. या फोनचे वजन १९० ग्रॅम आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here