रिलायन्स जिओच्या एका प्लानने धमाका केला आहे. Reliance Jio च्या एका प्लानमध्ये कमी किमतीत, दररोज २ GB डेटा मिळतो. तसेच, Disney + Hotstar ची एक वर्षासाठी मोफत सदस्यता मिळते. या प्लानसमोर एअरटेल आणि वोडाफोन आयडियाचे प्लानही फेल झाले आहेत. Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea कडे अधिक डेटासह अनेक प्लान्स आहेत. ज्या लोकांना अधिक डेटाची आवश्यकता आहे ते हे प्लान्स निवडू शकतात. टेलिकॉम कंपन्या ५०० रुपयांपेक्षा कमी प्लान ऑफर करतात. ज्यामध्ये अनेक फायदेही मिळतात. तिन्ही कंपन्या २ GB आणि ३ GB डेली डेटासह प्लान्स ऑफर करत असून हे प्लान्स खूप लोकप्रिय आहेत. तुम्ही जर कामानिमित्त खूप इंटरनेट वापरत असाल तर हे प्लान्स तुमच्या नक्की कामी येतील.जाणून घ्या या प्लान्सबद्दल सविस्तर आणि खरेदी करा यातील बेस्ट.

VI डेटा प्लान्स

vi-

व्होडाफोन आयडिया हेवी डेटा प्लान्स : शेवटी, Vodafone Idea किंवा Vi कोणतेही २ GB प्लान ऑफर करत नाहीत जे वरील दोन telcos प्रमाणेच अतिरिक्त फायदे देतात. Vi २८ दिवसांच्या वैधतेसाठी ३५९ रुपये किंमतीचा २GB / दिवस प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस/दिवस उपलब्ध आहेत. प्लान्स कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश प्रदान करत नाही. टेलको रिलायन्स जिओ प्रमाणेच ३ GB/ दिवस प्लॅन ऑफर करते आणि अधिक डेटा देखील ऑफर करते.

Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन

disney-hotstar-

Bharti Airtel चा हा प्लान Disney + Hotstar मोबाईल चे वार्षिक सबस्क्रिप्शन देखील प्रदान करतो. दुसरीकडे, ३ GB/दिवस Plan Jio पेक्षा किंचित स्वस्त आहे. टेलको २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी ३ GB / दिवस प्रीपेड प्लान ५९९ रुपयांच्या किंमतीवर ऑफर करते. या प्लान अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस/दिवस उपलब्ध आहेत. या प्लॅनचे फायदे देखील सारखेच आहेत, कारण युजर्सना Disney+ Hotstar Mobile च्या वार्षिक सबस्क्रिप्शनमध्ये प्रवेश मिळतो. मोबाईल एडिशन Amazon प्राइम व्हिडिओ आणि विंक म्युझिकची मोफत चाचणी मिळते.

Airtel चे हेवी डेटा प्लान्स

airtel-

भारती एअरटेल हेवी डेटा प्लान Bharti Airtel रिलायन्स जिओ प्रमाणेच प्रीपेड प्लान ऑफर करते. त्यासोबत मिळणारे फायदे थोडे वेगळे आहेत. Airtel २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी ४९९ रुपयांच्या किंमतीवर २ G B/ दिवस प्रीपेड प्लान ऑफर करते. Airtel च्या या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस / दिवस उपलब्ध आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या मोबाइल आवृत्तीसाठी मोफत चाचणी तसेच विंक म्युझिकमध्ये प्रवेश यासारखे अतिरिक्त फायदे यामध्ये समाविष्ट आहेत.

​खूप डेटा वापरणाऱ्यांसाठी प्लान

तुम्ही जर अधिक डेटा वापरता असाल तर तुम्ही ३ GB/ दिवस प्लान घेऊ शकता. खूप डेटा वापरणाऱ्यांसाठी देखील Reliance Jio कडे मस्त प्लान आहे. Relanice Jio ६०१ रुपयांच्या किमतीत २८ दिवसांच्या वैधतेसह ३ GB/दिवस प्रीपेड प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल आणि १०० एसएमएस/ दिवस उपलब्ध आहेत. युजर्सना दररोज ३ GB डेटा व्यतिरिक्त, वापरकर्त्यांना एकूण ६ GB अतिरिक्त डेटा देखील मिळतो. हा प्लान Disney + Hotstar मोबाइल OTT प्लॅटफॉर्मवर वार्षिक सदस्यता प्रदान करते.

​जिओचे डेटा प्लान्स भारी

भारतातील अग्रगण्य दूरसंचार ऑपरेटर प्रीपेड प्लान्स ऑफर करते. जे इतर दूरसंचार कंपन्यांपेक्षा किंचित अधिक परवडणारे आहेत. टेल्कोकडे ऑफर करण्यासारखे बरेच काही आहे. Jio एक प्रीपेड प्लान ऑफर करते. जो, २८ दिवसांच्या वैधतेच्या कालावधीसाठी ४९९ रुपयांच्या किंमतीवर दररोज २ GB डेटा ऑफर करतो. हा प्लान अनलिमिटड व्हॉइस कॉल्स आणि १०० SMS/ दिवस ऑफर करतो. याव्यतिरिक्त, युजर्सना Disney+ Hotstar मोबाइल OTT प्लॅटफॉर्मवर वार्षिक सदस्यतासह काही Jio अॅप्लिकेशन्समध्ये प्रवेश मिळतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here