नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा जर तुमचा प्लान असेल तर सध्या तुमच्यासाठी बेस्ट संधी आहे. नामांकित ई- कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टकडे तुमच्यासाठी बेस्ट ऑफर्स आहेत. होळीच्या खास प्रसंगी फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलचे आयोजन करण्यात आले असून सेल आजपासून म्हणजेच १२ मार्चपासून सुरू होत आहे. जो १६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तुम्ही या सेलमध्ये प्रत्येक रेंजमधील फोन्स अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्हाला या सेलमध्ये Apple iPhone, Samsung, Realme आणि Xiaomi ब्रँडचे स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह मिळतील. सेलमध्ये बँक ऑफर्स देखील देण्यात येत आहे. म्हणजेच, तुम्ही SBI कार्डने फोन खरेदी केल्यास तुम्हाला १० टक्के त्वरित सूट मिळेल. तसेच इतरही अनेक ऑफर्स फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये देण्यात येत आहे. पाहा डिटेल्स आणि खरेदी करा बेस्ट स्मार्टफोन.

Infinix Note 11

infinix-note-11

फ्लिपकार्ट Infinix Note 11 ११,४९९ रुपयांत विकण्यात येत आहे. तसेच, SBI क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ७५० रुपयांची सूट देण्यात येत आहे . Infinix फोन एक्सचेंज डिस्काउंटसह देखील उपलब्ध आहे. वैशिष्ट्यांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास Infinix Note 11 मध्ये १८० Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.७ -इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले, ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरे आणि ३३ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० mAh बॅटरी देण्यात आलीआहे. स्मार्टफोन ड्युअल स्पीकरसह DTS-HD साउंडसह येतो.

iphone SE 2020

iphone-se-2020

iPhone SE (2020) चे १२८ GB मॉडेल फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये २९,९९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. iPhone SE (2020) ४.७ -इंचाच्या रेटिना HD डिस्प्लेसह येतो आणि त्यात १२ मेगापिक्सेलचा मागील कॅमेरा सेन्सर आहे Apple Store वर iPhone SE (2020) ची विक्री थांबवण्यात आली आहे. पण तुम्ही हा फोन फ्लिपकार्टवरून २९,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. फोन लिमिटेड स्टॉपमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. iPhone SE (2022) मॉडेल नुकताच लाँच करण्यात आला आहे.

Xiaomi 11i Hypercharge

xiaomi-11i-hypercharge

हा फोन २२,४९९ रुपयांना विक्रीसाठी सादर करण्यात आला आहे. बँक ऑफरसह, फोन २१,४९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. Xiaomi 11i मध्ये ६.६७ -इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. फोन १२० Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येईल. फोन ३६० Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 920 5G चिपसेट वापरण्यात आला आहे. हा फोन डॉल्बी अॅटमॉस, ड्युअल साउंड सपोर्ट, स्टिरिओ स्पीकरसह येईल. Xiaomi 11i स्मार्टफोनमध्ये ४५०० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. फोनसोबत १२० W हायपरचार्ज तंत्रज्ञानाचा चार्जर देण्यात आला आहे.

Realme Narzo 30

realme-narzo-30

Realme Narzo 30 स्मार्टफोन २५०० रुपयांच्या सवलतीत ११,४९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्मार्टफोनमध्ये डिस्प्लेवर फ्रंट कॅमेऱ्यासाठी एक लहान पंच-होल कटआउट देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G95 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो १२nm फॅब्रिकेशन प्रोसेसवर आधारित आहे. ग्राफिक्ससाठी यात माली-G76 GPU देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये ६GB रॅम व १२८GB इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे.स्टोरेजला मायक्रो-एसडी कार्डद्वारे वाढवता येईल. फोन अँड्राइड 11 वर आधारित रियलमी UI 2.0 वर चालतो.

Motorola Edge 20 Fusion

motorola-edge-20-fusion

Motorola Edge 20 Fusion या १०८ मेगापिक्सेल फोनच्या खरेदीवर ४००० रुपयांची सूट दिली जात आहे. अशात हा फोन २०,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. हे डिव्हाइस ड्युअल-सिमला सपोर्ट करते. फोन Android ११ आधारित MyUX ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात ६.७ -इंच फुल एचडी+ डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन १०८०x२४०० पिक्सेल आहे. यात OLED मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो २०:९ आहे. त्याचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. हे ऑक्टा-कोर मीडियाटेक ९८०० U 5G प्रोसेसरसह सुसज्ज आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here