खासगी टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea कडे अनेक शानदार प्रीपेड प्लान्सची मोठी लिस्ट आहे. कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कमी किंमतीत जास्तीत जास्त बेनिफिट्स आपल्या प्लान्समध्ये देत आहे. कंपन्यांकडे अगदी २८ दिवसांपासून ते वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स उपलब्ध आहेत. अनेकजण एकदम वर्षाचा रिचार्ज करण्याऐवजी दरमहिन्याला रिचार्ज करत असतात. तुम्ही देखील दरमहिन्याला प्रीपेड प्लान्स खरेदी करत असाल तर Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea कडे काही चांगले रिचार्ज उपलब्ध आहेत. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह अतिरिक्त बेनिफिट्सचा देखील फायदा मिळत आहे. २८ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या या प्लान्सची सुरुवाती किंमत ३०० रुपयांपेक्षा कमी आहे. टेलिकॉम कंपन्या Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या या स्वस्त प्रीपेड प्लान्समध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सविषयी जाणून घेऊया.

​Reliance Jio चे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

reliance-jio-

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे शानदार प्लान्स उपलब्ध आहे. कंपनीकडे २९९ रुपयांचा प्लान असून, यात २८ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जात आहे. कंपनीकडे २३९ रुपयांचा स्वस्त प्लान देखील उपलब्ध असून, यात तुम्हाला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज मोफत १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लान्समध्ये जिओ अ‍ॅप्सचे देखील मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.

​Reliance Jio चे इतर स्वस्त प्लान्स

reliance-jio-

Reliance Jio कडे २०९ रुपये किंमतीत येणारा स्वस्त प्लान उपलब्ध आहे. या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी दररोज १ जीबी डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा देखील मिळते. जिओकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारा ६०१ रुपयांचा प्लान देखील उपलब्ध आहे. या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ६ जीबी डेटा मिळेल. तसेच, Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. हे सर्व प्लान्स जिओ अ‍ॅप्सच्या सबस्क्रिप्शनसह येतात.

​Airtel चे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

airtel-

एअरटेलकडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे २६५ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये आणि ५९९ रुपये किंमतीचे प्लान्स उपलब्ध आहेत. या प्लानमध्ये क्रमशः दररोज १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी आणि ३ जीबी डेटा मिळतो. या सर्व प्लानमध्ये तुम्हाला Amazon Prime Video चे मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शन मिळते. तर ५९९ रुपयांचा प्लान Disney+ Hotstar च्या मोफत सबस्क्रिप्शनसह येतो. या सर्व प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा मिळेल.

एअरटेलकडे ४४९ रुपयांचा स्वस्त प्लान उपलब्ध आहे. यामध्ये २८ दिवसांसाठी दररोज २.५ जीबी डेटाचा फायदा मिळतो. यात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस मिळतात. कंपनीकडे १७९ रुपयांचा प्लान असून, यात एकूण २ जीबी डेटा आणि ३०० एसएमएस मिळतात. याची वैधता देखील २८ दिवस आहे.

​Vodafone Idea (Vi) चे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स

vodafone-idea-vi-

Vodafone Idea कडे २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे २६९ रुपये, २९९ रुपये, ३५९ रुपये, ४०९ रुपये आणि ४७५ रुपये किंमतीचे प्लान्स उपलब्ध असून, यात क्रमशः १ जीबी, १.५ जीबी, २ जीबी, २.५ जीबी आणि ३ जीबी डेटा मिळतो. हे सर्व प्लान्स अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएससह येतो. कंपनीकडे ५०१ रुपयाचा प्लान देखील उपलब्ध असून, यात दररोज ३ जीबी डेटा आणि वर्षभरासाठी डिज्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळेल. इतर बेनिफिट्स समान आहेत. वीआयच्या या सर्व प्लान्समध्ये बिंज ऑल नाइट, वीकेंड डेटा रोल ओव्हर, दरमहिन्याला २ जीबी डेटा बॅकअपची देखील सुविधा दिली जात आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here