म. टा. प्रतिनिधी, नाशिक

योग्य आहार-विहार, व्यायाम प्रकार यामुळे उत्तम आरोग्य लाभत असले तरी, हल्लीच्या धावपळीच्या काळात व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाला हा वेळ मिळाला आहे. त्याचा उपयोग प्रत्येकाने फिटनेससाठी करावा, या उद्देशाने आयपीएस डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी ” या उपक्रमाची फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून सुरुवात केली आहे. आपला व्यायाम करतानाचा व्हिडीओ, फोटो टाकून एकमेकांना प्रोत्साहित करणारी ही चळवळ अनेकांसाठी प्रेरक ठरत आहे.

निरोगी आयुष्यासाठी ‘फिटनेस’ महत्त्वाचा असतो. त्यासाठी जो व्यायाम गरजेचा असतो तो काही विशिष्ट वयात किंवा फक्त काही काळच करायचा नसतो. त्यात सातत्य असणे आवश्यक असते. हा संदेश ‘अॅम्बेसेडर ऑफ फिटनेस’ या फेसबुक पेजमार्फत उभ्या राहणाऱ्या चळवळीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अनेक व्यक्ती या चळवळीशी जोडले गेले असून, दिवसागणिक ही संख्या वाढत आहे. व्यायाम करतानाचे आपले व्हिडीओ, फोटो किंवा माहिती या पेजवर शेअर केली जात आहे.

सोशल मिडिया हा कोणताही उदात्त आणि लोककल्याणकारी उद्देश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी आजच्या काळातील सर्वात प्रभावी पर्याय आहे. याच माध्यमाचा उपयोग एकमेकांमध्ये व्यायामाची आवड व सवय निर्माण करण्यासाठी करता येऊ शकतो.

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभ
सध्याच्या करोनासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यक्तिगत स्वच्छता, निर्जंतुकीकरण , सोशल डिस्टन्सिंग आणि उत्तम प्रतिकारशक्ती या गोष्टींची गरज आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्यायाम करण्याने लाभ होतो. सध्या जिम बंद आहेत, तसेच घराबाहेरही पडायचे नसल्याने पुशअप्स, पुलअप्स, योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार आणि ध्यान यांसारख्या शरीराला आणि मनाला तंदुरुस्त राखणाऱ्या व्यायामाची जीवनशैली अंगीकारण्यासाठी हा फेसबुक ग्रुप महत्त्वाच्या असल्याच्या भावना सहभागी सदस्यांनी व्यक्त केल्या आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here