ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर दर आठवड्याला अनेक वेगवेगळ्या सेलचे आयोजन केले जात असते. Amazon वर सुरू असलेल्या सेलमध्ये तुम्ही स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉपसह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंना स्वस्तात खरेदी करू शकता. याशिवाय फॅशन प्रोडक्ट्सवर देखील Amazon वर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळत आहे. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. Amazon वर वेगवेगळ्या कंपन्यांच्या ५५ इंच स्मार्ट टीव्हींवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुम्ही Amazon Basics, Kodak, Redmi आणि Sony च्या स्मार्ट टीव्हींना आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. हे टीव्ही दमदार फीचर्ससह येतात. यामध्ये तुम्हाला वॉइस असिस्टेंट, महत्त्वाच्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळेल. हे टीव्ही तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफर्ससह खरेदी करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​Amazon Basics Smart Led TV

amazon-basics-smart-led-tv

Amazon Basics Smart Led TV मध्ये ५५ इंच ४के अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि वाइड व्ह्यूइंग अँगल १७८ डिग्री आहे. टीव्हीमध्ये २० वॉटचे डॉल्बी एटमॉस स्पीकर दिले आहेत. तर कनेक्टिव्हिटीसाठी ३ HDMI पोर्ट, एक USB ३.० पोर्ट आणि एक USB २.० पोर्ट मिळतात. या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ६६ हजार रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३५,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. यावर ४,०८० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.

​50 inch Kodak Smart LED TV

50-inch-kodak-smart-led-tv

Kodak Smart LED TV मध्ये ५० इंच अल्ट्रा एचडी डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात २४ वॉट स्पीकर सपोर्ट मिळतो. तसेच, सेट टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेअर आणि गेमिंग कंसोल कनेक्ट करण्यासाठी ३ HDMI आणि २ USB पोर्ट दिले आहे. टीव्हीच्या रिमोटमध्ये YouTube, Prime Video आणि SonyLiv साठी बटन दिले आहे. Kodak Android LED TV ची मूळ किंमत ३८,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

​Redmi Smart LED TV

redmi-smart-led-tv

Redmi Smart LED TV मध्ये ५५ इंच ४K ultra HD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात ३० वॉट डॉल्बी एटमॉस स्पीकर दिले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी ३ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिला आहे. हा टीव्ही यूनिव्हर्सल सर्च, गुगल असिस्टेंट, क्रोमकास्ट आणि अन्य फीचर्ससह येतो. रिमोटमध्ये Netflix, Prime Video आणि Google Assistant चे बटन दिले आहेत. टीव्हीची मूळ किंमत ५४,९९९ रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ३९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, एक्सचेंज ऑफरचा देखील मिळेल.

​Sony Smart LED TV

sony-smart-led-tv

Sony Smart LED TV च्या ५५ इंच टीव्हीमध्ये 4K Ultra HD डिस्प्ले दिला असून, यात २० वॉट डॉल्बी एटमॉस स्पीकरचा सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी ४ एचडीएमआय पोर्ट आणि २ यूएसबी पोर्ट दिले आहेत. तसेच, इन-बिल्ट Google TV आणि Alexa वॉइस सर्चचा सपोर्ट मिळतो. Sony Bravia Smart LED Google TV ची किंमत १,०९,९०० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये ७४,९९० रुपयात खरेदी करू शकता. यावर एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here