भारतीय बाजारात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे अनेक स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा आपले बजेट कमी असल्याने चांगला फोन खरेदी करणे शक्य होत नाही. बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध असल्याने कोणता फोन खरेदी करावा याबाबत गोंधळ निर्माण होतो. तुमचे बजेट जर १५ हजार रुपयांपर्यंत असल्यास या किंमतीत तुम्ही अनेक शानदार फोन्स खरेदी करू शकता. या किंमतीत येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६ इंच डिस्प्ले मिळेल. यासोबतच, काही फोन्स ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येतात. १५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत बाजारात MOTOROLA G51 5G, SAMSUNG GALAXY F22, REALME NARZO 50 आणि REDMI NOTE 11 सारखे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

MOTOROLA G51 5G

motorola-g51-5g

MOTOROLA G51 5G स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले आहे. या फोनची सुरुवाती किंमत फक्त १४,९९० रुपये आहे. हा फोन ५जी कनेक्टिव्हिटीसह येतो. या डिव्हाइसमध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सल मुख्य रियर कॅमेरा आणि फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. फोन २ तासात फुल चार्ज होतो. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो.

SAMSUNG GALAXY F22

samsung-galaxy-f22

सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले असून, याची किंमत फक्त १४,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.४ इंच sAMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. पॉवर बॅकअपसाठी यात १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन फुल चार्ज होण्यासाठी १ तास लागतो. फोटोग्राफीसाठी यात ४८ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. फोन ५जी कनेक्टिव्हिटीसह येतो.

REALME NARZO 50

realme-narzo-50

REALME NARZO 50 स्मार्टफोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज दिले असून, याची सुरुवाती किंमत १२,४९९ रुपये आहे. हा फोन खूपच हलका आहे. यामध्ये ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी रियलमीच्या या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. तर फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो.

REDMI NOTE 11

redmi-note-11

REDMI NOTE 11 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत १४,४९९ रुपये आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल. Redmi Note सीरिज ही Xiaomi ची भारतातील सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन सीरिज आहे. यामध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच, ड्यूल स्पीकर सपोर्ट मिळतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर पॉवर बॅकअपसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here