व्हॉट्सअॅपवर एक मेसेज खूप शेअर करण्यात येत आहे. या मेसेजनुसार () चा लॉकडाऊनसंदर्भात एक प्रोटोकॉल आहे. भारत सध्या या प्रोटोकॉलच्या दुसऱ्या टप्प्यात आहे.
मेसेजच्या माहितीनुसार, WHO ने या प्रोटोकॉल अंतर्गत याआधी केवळ एक दिवसाचा लॉकडाऊन केला होता. त्यानंतर २१ दिवसांचा लॉकडाऊन असतो. हा काळ पूर्ण करण्यासाठी ५ दिवसांचा आराम आणि त्यानंतर पुन्हा तिसऱ्या टप्प्यात २८ दिवसांचा लॉकडाऊन असतो. त्यानंतर पुन्हा ५ दिवसांचा आराम आणि चौथ्या टप्प्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन असतो.
मेसेजमध्ये हेही म्हटले की, भारत सरकार याच प्रोटोकॉलचे पालन करीत आहे. त्यामुळे २२ मार्च रोजी १ दिवसाचा, त्यानंतर २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आता १५ एप्रिल ते १९ एप्रिल पर्यंत आराम केला जाईल. त्यानंतर पुन्हा २० एप्रिल ते १८ मे पर्यंत २८ दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा करण्यात येईल.
जर या दरम्यान, कोविड-१९ चे नवीन रुग्ण मिळाले नाही. तर लॉकडाऊन संपवला जाईल. नाही तर पुन्हा २५ मे ते १० जून पर्यंत पुन्हा एकदा १५ दिवसांचा अखेरचा लॉकडाऊन घोषित केला जाईल.
या मेसेजमध्ये लोकांनी मानसिक तयारी ठेवावी, असेही म्हटले आहे.
टाइम्स फॅक्ट चेकच्या अलर्ट वाचकांनी आम्हाला आमच्या व्हॉट्सअॅपवर हा मेसेज पाठवून याविषयीची खरी माहिती जाणून घेण्याची विनंती केली.
खरं काय आहे ?
जागतिक आरोग्य संघटनेने असा कोणताही मेसेज पाठवला नाही. या मेसेजच्या दाव्यासोबत WHO चे काहीही देणे-घेणे नाही.
टाइम्स फॅक्ट चेकने WHO च्या वेबसाइटवर जावून याची पडताळणी केली. परंतु, आम्हाला या ठिकाणी कोणताही असा प्रोटोकॉल मिळाला नाही.
वेगवेगळ्या टप्प्यात लॉकडाऊनचा मेसेज हा काही खोट्या बातम्या पसरवण्यात आल्याने आता व्हायरल केला जात आहे.
कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी याआधीच हे स्पष्ट केले आहे की, कोविड-१९ ला रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन वाढवण्याची केंद्र सरकारची कोणतीही योजना नाही.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times