Vivo Y50 ची किंमत
विवोच्या या फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनची किंमत २४९ डॉलर म्हणजेच १८ हजार ९५० रुपये आहे. हा फोन ब्लू आणि ब्लॅक या दोन रंगात खरेदी करता येवू शकणार आहे. तसेच या फोनची प्री बुकिंग आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही बुकिंग ११ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे.
Vivo Y50 चे खास वैशिष्ट्ये
विवोने या फोनमध्ये ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. यात पंचहोल डिझाईन देण्यात आली आहे. तसेच या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६५ आणि ८ जीबी रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
Vivo Y50 चा कॅमेरा
या फोनमथ्ये क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये फ्रंटला किती कॅमेरा असणार आहे, याबद्दल कंपनीने अद्याप माहिती सांगितली नाही.
Vivo Y50 ची बॅटरी
कंपनीने या फोनमध्ये बॅकअपसाठी या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. तसेच युजर्संना या फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, हेडफोन जॅक आणि यूएसबी पोर्ट यासारखी फीचर्स दिली आहेत.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times