भारतीय बाजारात स्मार्टफोन, लॅपटॉपसोबतच गेल्या काही महिन्यात स्मार्टवॉचची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहक नियमित घड्याळ खरेदी करण्याऐवजी स्मार्टवॉचला प्राधान्य देत आहेत. ग्राहकांची मागणी पाहता कंपन्या देखील एकापेक्षा एक शानदार स्मार्टवॉच लाँच करत आहे. तुम्ही जर स्वतःसाठी अथवा इतरांसाठी नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. होळीच्या निमित्ताने या वॉचला खरेदी करणे देखील तुमच्या फायद्याचे ठरेल. ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर डील ऑफ द डे मध्ये अनेक चांगल्या Smart Watch स्वस्तात उपलब्ध आहेत. तुम्ही कमी किंमतीत boAt Xtend स्मार्टवॉच, Noise Colorfit Pulse स्मार्टवॉच, Noise Colorfit Ultra Bezel-Less आणि TAGG Verve NEO स्मार्टवॉचला खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनवर स्वस्तात उपलब्ध असलेल्या या स्मार्टवॉचच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया.

​boAt Xtend स्मार्टवॉच

boat-xtend-

boAt Xtend स्मार्टवॉचमध्ये १.६९ इंच एचडी डिस्प्ले दिला आहे. ही वॉच बिल्ट-इन अ‍ॅलेक्सा सपोर्टसह येते. यामध्ये मल्टीपल वॉच फेसेज दिले आहेत. याशिवाय १४ स्पोर्ट्स मोडचा देखील सपोर्ट मिळतो. यामध्ये अनेक हेल्थ फीचर्स देखील दिले असून, यात स्ट्रेस मॉनिटर, हार्ट आणि Spo2 मॉनिटरिंगचा समावेश आहे. वॉच ५एटीएम वॉटर रेसिस्टेंट आहे. या वॉचची किंमत ७,९९० रुपये आहे. परंतु, ५,२९१ रुपयांच्या डिस्काउंटनंतर २,६९९ रुपयात खरेदी करू शकता.

​Noise Colorfit Pulse

noise-colorfit-pulse

Noise Colorfit Pulse स्मार्टवॉचमध्ये १.४ इंच फुल टच डिस्प्ले दिला आहे. या वॉचमध्ये शानदार हेल्थ फीचर्स देखील मिळतात. यामध्ये तुम्हाला Spo2, हार्ट रेट, स्लिप मॉनिटर सारखे फीचर्स मिळतील. Noise ची ही शानदार स्मार्टवॉच ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ६० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. वॉचची मूळ किंमत ४,९९९ रुपये आहे. परंतु, ३ हजार रुपये डिस्काउंटनंतर फक्त १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. अ‍ॅमेझॉनवर या वॉचला ३२ हजारांपेक्षा अधिक यूजर्सने ४ स्टार रेटिंग दिले आहे.

​Noise Colorfit Ultra Bezel-Less

noise-colorfit-ultra-bezel-less

Noise Colorfit Ultra Bezel-Less स्मार्टवॉचमध्ये १.७५ इंच फुल टच डिस्प्ले दिला आहे. सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी १० दिवस टिकते. म्हणजेच, वॉचला एकदा चार्ज केल्यानंतर तुम्ही १० दिवस वापरू शकता. यामध्ये हेल्थशी संबंधित अनेक फीचर्सचा सपोर्ट मिळतो. वॉचमध्ये Spo2, हार्ट रेट, स्लिप मॉनिटर सारखे फीचर्स दिले आहेत. स्मार्टवॉच ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ५० टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. या वॉचची मूळ किंमत ५,९९९ रुपये आहे. परंतु, ३ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त २,९९९ रुपयात खरेदी करू शकता.

​TAGG Verve NEO स्मार्टवॉच

tagg-verve-neo-

TAGG Verve NEO स्मार्टवॉचमध्ये देखील १.६९ इंच फुल टच डिस्प्ले दिला आहे. याची बॅटरी सिंगल चार्जमध्ये १० दिवस टिकते. याशिवाय हार्ट रेट, Spo2 आणि स्लिप मॉनिटर सारख्या शानदार हेल्थ फीचर्सचा देखील यात सपोर्ट दिला आहे. यात २० स्पोर्ट्स मोड मिळतात. तसेच, वॉटर रेसिस्टेंटसाठी आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. तसेच, मेसेज आणि कॉल नॉटिफिकेशन देखील मिळेल. या वॉचची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे. परंतु, २४०० रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त १,५९९ रुपयात खरेदी करू शकता.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here