तुम्ही जर जर स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर, सध्या तुमच्याकडे बेस्ट संधी आहे. Amazon Mobile Savings Days सेल भारतात सुरू झाला असून या सेलमध्ये अनेक जबरदस्त स्मार्टफोन्स मोठ्या डिस्काउंटसह विकण्यात येत आहे. यावेळी Amazon Mobile Savings Days मध्ये स्मार्टफोन आणि मोबाईल अॅक्सेसरीजवर तब्बल ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. हा नवीन सेल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर लाईव्ह असून मार्च १९ पर्यंत सुरू राहणार आहे. सेलमध्ये नवीन OnePlus Nord CE 2 5G सोबत, iQoo 9 Pro 5G आणि iQoo 9 SE, Realme Narzo 50A आणि Realme Narzo 30 5G, Xiaomi 11 Lite NE 5G, Mi 11X Pro सारखे प्रीमियम हँडसेट देखील विक्रीदरम्यान सवलतीसह उपलब्ध आहेत. खरेदी करा यातील बेस्ट आणि तुमच्या बजेटमध्ये येणारा स्मार्टफोन. जाणून घ्या ऑफर्स.

​Xiaomi smartphones

xiaomi-smartphones

Xiaomi फोन्सबद्दल बोलायचे झाले तर, Xiaomi 11 Lite NE 5G सेल दरम्यान बँक डिस्काउंटसह २६,९९९ रुपयांऐवजी २१,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. एक्सचेंज अंतर्गत, ग्राहकांना ५,००० रुपयांची अतिरिक्त सूट देखील मिळेल. डिव्हाइस अँड्रॉइड ११ वर आधारित MIUI १२.५ वर काम करते. यात ६.५५ इंच फुल HD+ डिस्प्ले आहे.ज्याचे, पिक्सेल रिझोल्यूशन १०८०x२४०० आहे. यात ९० Hz रिफ्रेश रेट, २४० Hz टच सॅम्पलिंग रेट, HDR १०+ आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत त्याचप्रमाणे, Mi 11X Pro ३६,९९९ रुपयांऐवजी ३१,९९ रुपयांना सूचीबद्ध आहे.

Realme Smartphones

realme-smartphones

या सेलमध्ये Realme Narzo 50A आणि Realme Narzo 30 5G वर १,५०० रुपयांचा बँक कॅशबॅक आणि २,००० पर्यंतचे Amazon कूपन दिले जात आहे. सेल दरम्यान, ते अनुक्रमे ९,७४९ रुपये आणि १३,४९९ रुपयांना खरेदी केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे Realme Narzo 50 १२,९९९ रुपयांऐवजी ११,६९९ रुपयांना उपलब्ध असेल. Realme Narzo 30 5Gमध्ये स्मार्टफोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ (१०८०x२४००) पिक्सल डिस्प्ले देण्यात आला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट १२८० हर्ट्ज आहे.प्रोसेसर, रॅम व स्टोरेज: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०० ५जी चिपसेटसह ६ जीबी रॅम आणि ११८ जीबी स्टोरेज मिळेल.

​iQoo Z3, iQoo Z5

iqoo-z3-iqoo-z5

iQoo Z3 आणि iQoo Z5: iQoo Z3 आणि iQoo Z5 सवलतीसह अनुक्रमे १६,९९० आणि २०,९९० रुपयांमध्ये Amazon वर उपलब्ध आहेत. iQoo Z3 मध्ये ६.५८ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याचे पिक्सेल रिझोल्यूशन १०८०x२४०८ आहे. त्याचा रिफ्रेश दर १२० Hz आहे. हा फोन Qualcomm Snapdragon 768G 5G प्रोसेसर आहे. यात ४४०० mAh ची बॅटरी आहे जी ५५ W फ्लॅश चार्जवर काम करते. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक सेन्सर ६४ MP आहे. दुसरा ८ MP अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आहे. तिसरा २ MP सेन्सर आहे. फोनमध्ये १६ MP सेल्फी कॅमेरा आहे.

iQoo 9 Pro Offers

iqoo-9-pro-offers

Amazon च्या या नवीन सेलमध्ये iQoo 9 Pro चे ८ GB + २५६ GB व्हेरिएंट ६४,९९० रुपयांना उपलब्ध आहे. तसेच, सर्व बँक कार्डांवर ४,००० रुपयांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यासोबतच ग्राहकांना एक्सचेंज ऑफर अंतर्गत ३,००० रुपयांची अतिरिक्त सूटही मिळणार आहे. स्मार्टफोन्समध्ये १२० Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.७८ -इंच फुल एचडी + डिस्प्ले आहे. डिस्प्ले वक्र AMOLED LTPO डिस्प्ले आणि क्वाड HD + रिझोल्यूशनसह येतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे.

One Plus Smartphones

one-plus-smartphones

Amazon Mobile Savings Days सेल दरम्यान, ग्राहक OnePlus Nord CE 2 5G २१,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत बँक ऑफरसह खरेदी करू शकतात. यामध्ये फोनवर २३,९९९ रुपयांच्या किमतीच्या तुलनेत २,००० रुपयांची सूट दिली जात आहे. त्याचप्रमाणे, बँक ऑफरसह, OnePlus Nord 2 5G सेलमध्ये २९,९९९ रुपयांऐवजी २८,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. सेलमध्ये, One Plus 9 Pro आणि One Plus 9 अनुक्रमे ४९,९९९ आणि ३६,९९९ रुपयांमध्ये इन्स्टंट बँक सवलत आणि एक्सचेंज बोनससह उपलब्ध आहेत.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here