होळी, धुळवडीला रंग खेळताना असो अथवा नेहमी धुळ व घामामुळे अनेकदा स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता आहे. तसेच, पावसात देखील स्मार्टफोनला पाण्यापासून वाचवणे गरजेचे असते. फोनमध्ये थोडेही पाणी गेल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकत s. एकूणच, पाण्यापासून नेहमीच स्मार्टफोन सारख्या इलेक्ट्रिक गॅजेट्सची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेकजण मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अशा स्थितीमध्ये तुमच्यासाठी वॉटरप्रूफ स्मार्टफोन चांगला पर्याय ठरू शकता. सध्या कंपन्या वॉटरप्रूफ स्मार्टफोन लाँच करत आहेत, मात्र त्याचे प्रमाण जास्त नाही. बाजारात काही असे चांगले फोन उपलब्ध आहेत, जे आयपी रेटिंगसह येतात. या रेटिंगद्वारे फोन पाण्यात खराब होईल की नाही हे ठरते. बाजारात Apple, Samsung, ONEPLUS, Vivo आणि Xiaomi सारख्या ब्रँड्सचे काही चांगले फोन्स उपलब्ध आहेत. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या स्मार्टफोन्सविषयी जाणून घेऊया.

Apple iPhone 13 Pro Max

apple-iphone-13-pro-max

iPhone 13 Pro Max हा सर्वात सुरक्षित फोन मानला जातो व पाण्यात खराब होत नाही. हा फोन आयपी६८ रेटिंगसह येतो. कंपनीचा दावा आहे की, २० फूट खोल पाण्यात हा फोन ३० मिनिटंत सुरक्षित राहू शकतो. iPhone 13 Pro Max हे iPhone 13 सीरिजमधील टॉप व्हेरिएंट आहे. या फोनमध्ये ६.७ इंच OLED डिस्प्ले दिला आहे. तसेच, ए१४ बायोनिक चिपसेट मिळतो. फोटोग्राफीसाठी रियरला १२ मेगापिक्स + १२ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनची सुरुवाती किंमत १,२९,९०० रुपये आहे.

Samsung Galaxy S22 Ultra

samsung-galaxy-s22-ultra

iPhone 13 Pro Max प्रमाणेच Samsung Galaxy S22 Ultra स्मार्टफोन देखील आयपी६८ रेटिंगसह येतो. हा फोन २० फूट खाल पाण्यात ३० मिनिटं खराब होत नाही. या फोनमध्ये ६.८ इंच ओलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच, फोटोग्राफीसाठी रियरला १०८ मेगापिक्सल + १२ मेगापिक्सल + १० मेगापिक्सल + १० मेगापिक्सलचा क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. तर फ्रंटला ४० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. हा फोन Snapdragon ८ Gen १ चिपसेटसह येतो. फोनची सुरुवाती किंमत १,०९,९९९ रुपये आहे.

ONEPLUS 9 PRO

oneplus-9-pro

OnePlus 9 Pro हा स्मार्टफोन आयपी६८ रेटिंगसह येतो. फोन ५ फूट खोल पाण्यात ३० मिनिट खराब होत नाही. मात्र, त्याखाली जास्त वेळ पाण्यात राहिल्यास फोन खराब होऊ शकतो. ONEPLUS 9 PRO मध्ये ६.७ इंच QHD+ AMOLED कर्व्ड डिस्प्ले दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी ४८ मेगापिक्सल + ८ मेगापिक्सल + ५० मेगापिक्सल +२ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात Qualcomm SM८३५० Snapdragon ८८८ चिपसेटसह अनेक शानदार फीचर्स मिळतील. फोनची सुरुवाती किंमत ५९,९९९ रुपये आहे.

Vivo X70 Pro Plus

vivo-x70-pro-plus

Vivo X70 Pro Plus स्मार्टफोन IP६८ रेटिंगसह येतो. हा हँडसेट जवळपास २० फूट खोल पाण्यात ३० मिनिटांपर्यंत सुरक्षित राहतो. फोनमध्ये ६.५६ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल, ४८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल, १२ मेगापिक्सल पोर्ट्रेट लेंस आणि ८ मेगापिक्सल पेरिस्कोप सेंसर आहे. तर सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. फोनची सुरुवाती किंमत ७९,९९० रुपये आहे.

Xiaomi Mi 11 Ultra

xiaomi-mi-11-ultra

Xiaomi Mi 11 Ulta स्मार्टफोन देखील आयपी६८ रेटिंगसह येतो. कंपनीचा दावा आहे की, हा फोन १.५ मीटर खोल पाण्यात सहज सुरक्षित राहतो. यामध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात ६.८१ इंच एमोलेड डिस्प्ले, फोटोग्राफीसाठी ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तसेच, ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल. तर पॉवर बॅकअपसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. या फोनची सुरुवाती किंमत ६९,९९९ रुपये आहे.

(नोट – वरील स्मार्टफोन्सच्या किंमतीत व्हेरिएंट, स्टॉक आणि ऑफर्सनुसार बदल होऊ शकतो.)

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here