दावा
एका गाडीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि बसलेले दिसत आहेत. या व्हिडिओतून दावा करण्यात येत आहे की, या दोन्ही नेत्यांनी करोना व्हायरसमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केले आहे.

या व्हिडिओसोबत एक मेसेज शेअर केला जात आहे. पाहा, जगाला प्रवचन देणारे स्वतः मात्र कलम १४४ लागू असताना त्याचे उल्लंघन करीत आहेत.

टाइम्स फॅक्ट चेकच्या एका वाचकाने आम्हाला हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवून याची सत्य माहिती जाणून घेण्याची विनंती केली.

खरं काय आहे?

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे उल्लंघन केले नाही.

या खोट्या मेसेजसह जो व्हिडिओ शेअर केला जात आहे. तो व्हिडिओ २४ डिसेंबर २०१९ चा आहे. ज्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी या नेत्यांना मेरठमध्ये जाण्यास रोखले होते. राहुल आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) २०१९ आणि एनआरसी विरोधात आंदोलन करताना निधन झालेल्या कुटुंबातील व्यक्तींना भेटण्यासाठी ते मेरठला जात होते.

टाइम्स फॅक्ट चेकने या व्हिडिओला गुगल क्रोम एक्सटेंशन InVid च्या माध्यमातून अनेक फ्रेम्स तयार केले. त्यानंतर एक एक करून रिवर्स सर्च केल्यानंतर आम्हाला अनेक मीडियाच्या बातम्या मिळाल्या.

याप्रकरणी आम्हाला
मिळाला. २४ डिसेंबर २०१९ रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडिओचे शीर्षक ‘UP Police stop , from entering Meerut’ असे होते.

व्हिडिओसोबत देण्यात आलेल्या कॅप्शननुसार, उत्तर प्रदेश पोलिसांन राहुल आणि प्रियांका गांधी यांना मेरठमध्ये प्रवेश नाकारला. त्यांना जाण्यापासून रोखले. काँग्रेस नेत्यांनी पुकारलेल्या सीएए विरोधातील आंदोलनात मारल्या गेलेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी राहुल-प्रियांका गांधी जात होते. परंतु, उत्तर प्रदेश पोलिसांनी या दोघांनाही जावू दिले नाही. त्यांना परत पाठवले.

निष्कर्ष

डिसेंबर २०१९ चा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चुकीच्या दाव्याने शेअर करीत आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी लॉकडाऊनचे उल्लंघन केले नाही, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here