फोनवरील डेटाचा बॅकअप

फोन विकण्यापूर्वी हे विसरू नका: अँड्रॉइड स्मार्टफोन दुसऱ्या व्यक्तीला विकण्यापूर्वी, तुमच्या फोनवरील डेटाचा बॅकअप घ्या. तुम्ही तुमचे मेसेजेस, संपर्क सूची, व्हिडिओ, फोटो आणि इतर फाइल्सचा बॅकअप घेऊ शकता. तुमच्याकडे पेन ड्राइव्ह, मायक्रोएसडी कार्ड यांसारखे कोणतेही स्टोरेज असल्यास, तुम्ही या स्टोरेज पर्यायांमध्ये फोटो, व्हिडिओ आणि इतर महत्त्वाच्या फाइल्स मूव्ह करू शकता. तुमच्याकडे हे स्टोरेज पर्याय नसल्यास, तुम्ही कोणतेही ऑनलाइन क्लाउड स्टोरेज जसे की Google Drive, Dropbox इत्यादी वापरू शकता. आजच्या या हायटेक काळात तुमचा वैयक्तिक डेटा दुसर्‍या व्यक्तीकडे गेल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात

व्हॉट्सअॅप बॅकअप महत्त्वाचा

म्हणूनच व्हॉट्सअॅप बॅकअप महत्त्वाचा आहे: आजल्काल व्हॉट्सअॅप न वापरणारी व्यक्ती शोधून देखील सापडणार नाही. जर तुम्ही जुना फोन विकत असाल आणि तुम्हाला लवकरच नवीन स्मार्टफोन खरेदी करून तुमचे WhatsApp Chats नवीन फोनमध्ये हवे असतील. तर, यासाठी जुना फोन विकण्यापूर्वी, तुमच्या चॅट्सचा संपूर्ण बॅकअप Google Drive वर नक्कीच ठेवा. असे करण्याचा फायदा असा आहे की, जेव्हाही तुम्ही नवीन फोनमध्ये व्हॉट्सअॅप इन्स्टॉल कराल तेव्हा तुम्ही तुमचे जुने चॅट्स सहजपणे रिकव्हर करू शकाल.

सिमकार्ड संबंधित काम

जर सिमकार्डशी संबंधित हे काम केले नाही तर मोठे नुकसान होऊ शकते: फोन विकण्यापुवी सिम कार्ड संबधी गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच आवश्यक आहे. जुना फोन विकण्यापूर्वी तुमचे एग्झिस्टिंग सिम-कार्ड काढून टाकण्यास विसरू नका किंवा दुसर्‍या व्यक्तीच्या हातात तुमचा फोन पोहोचण्यापूर्वी सिम कार्ड काढून टाका. जर तुम्ही सिमकार्ड काढायला विसरलात तर, तुमच्या सिमकार्डचा चुकीच्या कामांसाठी वापर होऊ शकतो. समोरची व्यक्ती तुमच्या फोनचा गैरवापर करून तुमचे आर्थिक नुकसानही करू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here