आजकाल कंपन्या ग्राहकांची गरज आणि बजेटकडे विशेष लक्ष देत असल्याचे दिसून येते. देशातील इंटरनेट सेवा प्रदाते (ISPs) ग्राहकांना केवळ हाय-स्पीड हाय-एंड ब्रॉडबँड प्लान्सच ऑफर करत नाहीत. तर, त्यांच्या युजर्ससाठी परवडणाऱ्या योजना देखील देतात. ज्या चांगल्या कनेक्टिव्हिटी स्पीड देखील देतात. कंपन्या पुरेशा कनेक्टिव्हिटी गतीसह कमी किमतीचे प्लान्स देखील ऑफर करतात. जे बजेट-अनुकूल प्लान्स शोधत असलेल्या युजर्स साठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात. जर तुम्ही ब्रॉडबँड घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या सोयीसाठी आम्ही Jio, Airtel, BSNL यांसारख्या इतर कंपन्यांच्या काही परवडणाऱ्या ब्रॉडबँड प्लानची यादी तयार केली आहे. जी तुम्हाला नक्कीच आवडेल. या प्लान्समध्ये कमी किमतीत अनेक फायदे देण्यात येत आहे. ते तुमच्या कामी येतील. जाणून घ्या या प्लान्सविषयी सविस्तर आणि खरेदी करा बेस्ट ब्रॉडबँड प्लान.

Excitel चा अनलिमिटेड प्लान

excitel-

Excitel फक्त १०० Mbps, २०० Mbps किंवा ३०० Mbps इंटरनेट गतीसह ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करते. म्हणून, टेल्कोने ऑफर केलेला १०० Mbps प्लान हा त्याचा स्टार्टर किंवा सर्वात स्वस्त प्लान आहे. Excital च्या १०० Mbps प्लानची किंमत प्रति महिना ६९९ रुपये आहे. युजर्सना ते अनुक्रमे ३ महिने, ४ महिने, ६ महिने, ९ महिने आणि १२ महिन्यांसाठी ५६५ रुपये, ५०८ रुपये,४९० रुपये, ४२४ रुपये आणि ३९९ रुपये प्रति महिना मिळू शकतात. ९ महिन्यांचा प्लान फक्त नवीन ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. चांगली गोष्ट म्हणजे, हा प्लान अनलिमिटेड आहे. कारण, त्यात कोणतीही FUP डेटा मर्यादा नाही.

ACT चा स्वस्त ब्रॉडबँड प्लान

act-

ACT चा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान : बंगलोर स्थित इंटरनेट सेवा प्रदात्याचा सर्वात स्वस्त प्लान ‘ACT Basic’ आहे. जो दरमहा फक्त ५४९ मध्ये येतो आणि इंटरनेट युजर्सना ४० Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करतो. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. ज्यामध्ये ‘ACT Basic’ योजना ६ महिन्यांसाठी ४७० रुपये प्रति महिना या किमतीत उपलब्ध आहे. प्लानमध्ये एका महिन्यासाठी ५०० GB डेटा उपलब्ध आहे.

Connect चा स्वस्त ब्रॉडबँड प्लान: कनेक्ट ब्रॉडबँड भारतातील काही उत्तरेकडील राज्यांमध्ये जसे की पंजाब, हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये कनेक्शन प्रदान करते. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान ४९९ रुपये प्रति महिना येतो आणि ४० Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करतो. यामध्ये अनलिमिटेड लोकल आणि एसटीडी कॉलसह अनलिमिटेड डेटा मिळतो.

​BSNL चा बजेट ब्रॉडबँड प्लान

bsnl-

BSNL चा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान: BSNL देखील ग्राहकांना अनेक भन्नाट प्लान्स कमी किमतीत ऑफर करते. BSNL ची सर्वात पॉकेट-फ्रेंडली योजना ‘फायबर बेसिक’ आहे. जी ४४९ रुपये प्रति महिना येते आणि ३० Mbps चा इंटरनेट स्पीड देते. BSNL च्या या प्लानमध्ये ३३०० GB किंवा ३.३ TB डेटा एका महिन्यासाठी उपलब्ध आहे. तसेच, कंपनीने अलीकडेच “फायबर एंट्री” नावाचा नवीन ब्रॉडबँड प्लॅन सादर केला आहे. जो, दरमहा ३२९ रुपये येतो आणि २० Mbps चा इंटरनेट स्पीड देतो. या प्लानमध्ये यूजरला महिन्याभरासाठी तब्बल १००० GB डेटा मिळतो.

​एअरटेलचा ब्रॉडबँड प्लान

एअरटेलचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान: एअरटेल त्याच्या Xstream फायबर कनेक्शनसह सर्वात वेगवान ब्रॉडबँड कनेक्शन ऑफर करते. कंपनीचा सर्वात स्वस्त प्लान ४९९ रुपये प्रति महिना येतो आणि ४० Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करतो. या प्लानमध्ये यूजरला एका महिन्यासाठी ३.३ TB किंवा ३३०० GB डेटा मिळतो. Airtel त्याच्या ब्रॉडबँड प्लॅनसह ‘एअरटेल थँक्स बेनिफिट्स’ देखील ऑफर करते. ज्यामध्ये विंक म्युझिक आणि शॉ अकादमीचे सदस्यत्व समाविष्ट आहे. हा प्लान युजर्ससाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

जिओचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान

जिओचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान: JioFiber कडे ग्राहकांसाठी अनेक जबरदस्त प्लान्स आहेत. JioFiber चा सर्वात स्वस्त प्लान ३९९ रुपये प्रति महिना येतो आणि ३० Mbps चा इंटरनेट स्पीड ऑफर करतो. या प्लानमध्ये यूजरला एका महिन्यासाठी ३३०० GB किंवा ३.३ TB डेटा मिळतो. JioFiber च्या ३० Mbps प्लॅनचा वापर करून, ग्राहक अनेक उपकरणांवर unlimited internet प्रवेश मिळवू शकतात. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, JioFiber च्या ३९९ रुपये प्रति महिना प्लानच्या किंमतीवर देखील जीएसटी लागू होईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here