ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनने (Amazon) फॅब टीव्ही फेस्ट (Fab TV Fest) सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये अनेक लेटेस्ट स्मार्ट टीव्हींवर आकर्षक डील्स आणि डिस्काउंट दिले जात आहे. ग्राहक आपल्या आवडीचा ब्रँड OnePlus, Xiaomi, Redmi आणि Samsung च्या स्मार्ट टीव्हीला १,५०० रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकतात. Amazon Fab TV Fest सेलला २० मार्चपासून सुरू झाली असून, हा सेल २५ मार्च २०२२ पर्यंत सुरू राहील. Amazon च्या या सेलमध्ये तुम्ही जर २२ मार्च ते २५ मार्च २०२२ दरम्यान टीव्ही खरेदी करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला १० टक्क्यांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, Amazon पे रिवॉर्डवर २०० रुपये कॅशबॅक देखील दिला जात आहे. Fab TV Fest सेलमध्ये स्वस्तात उपलब्ध असलेल्या या टीव्हींविषयी सविस्तर जाणून घेऊया.

​LG च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

lg-

Amazon वर सुरू असलेल्या Fab TV Fest सेलमध्ये LG च्या स्मार्ट टीव्हींना तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये कंपनीचे ३२ इंचापासून ते ५५ इंचापर्यंतचे शानदार टीव्ही उपलब्ध आहेत. सेलमध्ये कंपनीच्या ३२ इंच आणि ५५ इंच बेस्ट सेलिंग स्मार्ट टीव्हीला तुम्ही १५,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. तसेच, ४३ इंच आणि ५५ इंच एलजी नॅनोसेल टीव्ही ४के अल्ट्री सीरिज स्मार्ट टीव्ही ४५,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत या सेलमध्ये उपलब्ध आहे.

​OnePlus च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

oneplus-

Amazon Fab TV Fest सेलमध्ये OnePlus च्या स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट दिले आहे. सेलमध्ये OnePlus TV U सीरिज जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. कंपनीच्या स्मार्ट टीव्हीला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. तसेच, सिटी बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. OnePlus च्या ३२ इंच आणि ५५ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही १६,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता.

​Redmi च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

redmi-

तुम्ही जर रेडमीचे स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्या खूपच फायद्याचा ठरेल. Amazon Fab TV Fest सेलमध्ये तुम्ही कंपनीच्या ३२ इंच आणि ६५ इंच स्मार्ट टीव्हींना स्वस्तात खरेदी करू शकता. या टीव्हीची सुरुवाती किंमत १३,४९९ रुपये आहे. याशिवाय, काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Redmi TV X 4K सीरिजच्या ४३ इंच आणि ६५ इंच स्मार्ट टीव्हीला २८,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करता येईल.

​Samsung च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

samsung-

Samsung क्रिस्टल ४के प्रो सीरिजला तुम्ही १६,९९० रुपये सुरुवाती किंमतीत देखील खरेदी करू शकता. या टीव्हींवर तुम्हाला बँक ऑफर्सचा देखील फायदा मिळेल. स्मार्ट टीव्हींना एचडीएफसी बँकेच्या कार्डचा वापर करून खरेदी केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट म्हणजेच १,५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. अ‍ॅमेझॉन पे रिवॉर्डसह २०० रुपये कॅशबॅकचा देखील फायदा मिळेल. अशाप्रकारे तुम्ही Fab TV Fest सेलमध्ये Samsung च्या शानदार टीव्हींना स्वस्तात खरेदी करू शकता.

​Sony च्या स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर

sony-

Amazon Fab TV Fest सेलमध्ये Sony चे स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्तात उपलब्ध आहेत. कंपनीच्या टीव्हीवर १५,००० हजार रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंटचा फायदा मिळेल. कंपनीच्या स्मार्ट टीव्हीला २३,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सोनीच्या ब्राविया सीरिजला तुम्ही २३,९९९ रुपये सुरुवाती किंमतीत खरेदी करू शकता. याशिवाय, १० टक्के इंस्टंट डिस्काउंट म्हणजेच १५०० रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. Sony Bravia 4K Ultra HD सीरिज ७४,९९० रुपये सुरुवाती किंमतीत उपलब्ध आहे.

(नोट – वरील स्मार्ट टीव्हींच्या किंमतीत ऑफर्स व स्क्रीन साइजनुसार बदल होऊ शकतो.)

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here