तुम्ही जर सवलतीच्या दरात तुम्ही तुमचा आवडता स्मार्टफोन खरेदी करू शकला नसाल, तर निराश होण्याची गरज नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला Realme, Samsung, Vivo आणि Infinix च्‍या काही सर्वोत्कृष्‍ट स्‍मार्टफोन्सबद्दल सांगत आहोत. जे मोठ्या डीलसह विकत घेतले जाऊ शकतात. हे हँडसेट २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात. तुम्ही Flipkart आणि Amazon India वरून १३,००० रुपयांपर्यंत मोठ्या सवलती आणि एक्सचेंज ऑफरसह ही डिव्हाइस ऑर्डर करू शकता आणि तुम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त डिव्हाइस घरी आणू शकता. या स्मार्टफोनमध्ये काही जबरदस्त फीचर्स देण्यात आले असून एखाद्या प्रीमियम फोनमध्ये असतील असे फीचर्स या फोन्समध्ये तुम्हाला वापरायला मिळतील. या स्मार्टफोनमध्ये realme 8 pro, realme narzo 30 pro,Samsung Galaxy A22 5G, infinix 10 pro सारख्या ब्रँडेड स्मार्टफोन्सचा समावेश आहे . पूर्ण लिस्ट

Infinix Note 10 Pro

infinix-note-10-pro

फ्लिपकार्टवर या फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटवर १५ टक्के सूट दिली जात आहे. डिस्काउंटनंतर या फोनची किंमत १६,९९९ रुपये झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त फायदा मिळू शकतो. याशिवाय, तुम्ही Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट करून ५ % अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळवू शकता. इनफिनिक्स नोट 10 मध्ये ६.९५ इंच (२४६०x१०८०) फुलएचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो G 85 प्रोसेसर देण्यात आला आहे.

Vivo Y 73

vivo-y-73

या फोनवर तुम्हाला कोणतीही एक्सचेंज ऑफर मिळणार नाही. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनवर ७ % सूट नक्कीच दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत १९,९९० रुपये झाली आहे. विवो Y73 स्मार्टफोनमध्ये कंपनीने ६.४४ इंच फुल एचडी+ AMOLED डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. तसेच, मीडियाटेक हीलियो जी९५ चिपसेटचा सपोर्ट दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे

Samsung Galaxy A22 5G

samsung-galaxy-a22-5g

Samsung Galaxy A22 5G: Samsung Galaxy A22 5G वर Flipkart वर ४ % सूट मिळाल्यानंतर फोनची किंमत सध्या १७,३९० आहे. तुम्ही या फोनसाठी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला ५ % अनलिमिटेड कॅशबॅकचा लाभ देखील मिळेल. Samsung Galaxy A22 5G फोनवर कोणतीही एक्सचेंज डील नाही. या फोनच्या डिझाइनमध्ये वॉटरड्रॉप नॉच, इनफिनिटी व्ही डिस्प्ले सोबत लाँच केले आहे. Samsung Galaxy A22 5G ला साइड मध्ये बेजल्स स्लीम देण्यात आले आहे.

Realme Narzo 30 Pro

realme-narzo-30-pro

Realme narzo 30 pro: ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनचा ब्लेड सिल्व्हर कलर व्हेरिएंट फ्लिपकार्टवर १९,९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. फोनवर कोणतीही सवलत ऑफर नाही. परंतु, तुम्ही Realme narzo 30 pro एक्सचेंज आणि बँक ऑफरसह नक्कीच खरेदी करू शकता. एक्सचेंज ऑफर अंतर्गत, तुम्हाला फोन 13 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात मिळू शकतो. त्याचप्रमाणे, तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड पेमेंटवर ५ % अनलिमिटेड कॅशबॅक देखील मिळवू शकता.

Realme 8 Pro

realme-8-pro

८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेजने सुसज्ज असलेल्या या फोनवर ९ % ची सूट दिली जात आहे. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत २०,०१० रुपये झाली आहे. विशेष बाब म्हणजे, हा फोन एक्सचेंज सोबत घेतल्यास तुम्हाला १३ हजार रुपयांपर्यंतचा अधिक फायदा मिळू शकतो. त्याच वेळी, हा फोन खरेदी करताना तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला ५ % अनलिइटेड कॅशबॅक देखील मिळेल. फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर आधारित रियलमी यूआय २.० वर काम करतो.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here