भारतीय बाजारात दर आठवड्याला अनेक कंपन्या नवनवीन स्मार्टफोन्स लाँच करत आहे. बाजारात अगदी ५ हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत येणारे स्मार्टफोन्स उपलब्ध आहेत. तुम्ही जर नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी बाजारात कमी बजेटमध्ये येणारे चांगले पर्याय उपलब्ध आहेत. लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर (Amazon) २२ मार्चपासून मोबाइल सेविंग्स डेजला (Mobile Savings Days) सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये वेगवेगळ्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंटचा फायदा मिळेल. तुम्ही बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरद्वारे फोन्सला स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलमध्ये तुम्हाला Oppo A31, Samsung Galaxy M12, Redmi Note 10 Pro, Realme Narzo 50 आणि vivo Y15s ला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. पूर्ण ऑफर्सचा लाभ मिळाल्यास हे फोन २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल.

​Oppo A31

oppo-a31

Oppo A31 स्मार्टफोनच्या १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत १५,९९० रुपये आहे. मात्र, सेलमध्ये तुम्ही फक्त १२,९८९ रुपयात खरेदी करू शकता. एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६५० रुपयांची सूट मिळेल. याशिवाय, फोनवर १२,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळत आहे. मात्र, एक्सचेंज ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. या ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास फोनला फक्त ३९ रुपयात खरेदी करू शकता.

​Samsung Galaxy M12

samsung-galaxy-m12

Samsung Galaxy M12 या स्मार्टफोनची मूळ किंमत १२,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही फक्त १०,४९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही जर एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५२५ रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा मिळेल. याशिवाय फोनवर ९,९०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर्सचा देखील लाभ मिळत आहे. दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा फोन फक्त ७४ रुपयात तुमचा होईल. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळेल.

​Redmi Note 10 Pro

redmi-note-10-pro

Redmi Note 10 Pro स्मार्टफोनची मूळ किंमत १९,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही अ‍ॅमेझॉनवरील सेलमध्ये फक्त १६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये तुम्हाला १ हजार रुपये कूपन डिस्काउंटचा देखील फायदा मिळत आहे. तसेच, एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ८५० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. Redmi Note 10 Pro वर १५ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळत आहे. या दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास या फोनला १४९ रुपयात खरेदी करू शकता.

​Realme Narzo 50

realme-narzo-50

Realme Narzo 50 स्मार्टफोन देखील सेलमध्ये आकर्षक ऑफर्ससह उपलब्ध आहे. या फोनची मूळ किंमत १५,९९९ रुपये आहे. परंतु, तुम्ही फक्त १२,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोनला खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ६५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, १२,२०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळत आहे. अशाप्रकारे, तुम्ही ऑफर्ससह या फोनला फक्त १४९ रुपयात खरेदी करू शकता. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

​vivo Y15s

vivo-y15s

दमदार डिस्प्लेसह येणाऱ्या Vivo Y15s स्मार्टफोनची मूळ किंमत १३,९९० रुपये आहे. परंतु, सेलमध्ये याची १०,९९० रुपयात विक्री होत आहे. या फोनला खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला ५५० रुपयांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, फोनवर १०,२५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. दोन्ही ऑफर्सचा पूर्ण लाभ मिळाल्यास vivo Y15s या स्मार्टफोनला तुम्ही फक्त १९० रुपयात खरेदी करू शकता.

(नोट – वरील स्मार्टफोन्सच्या किंमतीत ऑफर्स आणि व्हेरिएंटनुसार बदल होऊ शकतो.)

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here