WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे आणि जगभरातील लाखो युजर्स ते वापरतात. व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्सना आकर्षित करण्यासाठी कायम नवनवीन फीचर्स सादर करत असते. पण, हे अॅप वापरण्यासाठी काही नियम आणि निर्बंध देखील आहेत. विशेषत: भारतात, व्हॉट्सअॅपवर खोटी माहिती आणि फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी अत्यंत कठोर भूमिका घेतली जाते. चुकीचे कृत्य करणाऱ्यांना पकडण्यासाठी, WhatsApp आपल्या युजर्सना तक्रार करण्याची परवानगी देते आणि लोकांना खोट्या बातम्या आणि स्पॅम मेसेजबद्दल सतर्क करण्याचे मार्ग देखील सुचवते. म्हणजेच जे लोक व्हॉट्सअॅपवर अशा प्रकारचे काम करताना आढळतात, कंपनी थेट त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन करते. त्यामुळे अशा गोष्टींची काळजी घेणे आणि नकळत असे कोणतेही काम करणे टाळलेले बरे. आज आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे व्हॉट्सअॅप अकाउंट बॅन होऊ शकते.

द्वेष करणारे करणारे मेसेज पाठवू नका

WhatsApp आपल्या युजर्सना तक्रार करण्याची परवानगी देते. अनेकांनी एखाद्या युजर्सची तक्रार केल्यास किंवा अनेकांनी एखाद्या खात्याविरुद्ध तक्रार केल्यास त्याचे व्हॉट्सअॅप खाते बॅन होऊ शकते. WhatsApp वर इतरांना मेसेज पाठवतांना त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. युजर्सनी बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणारे, धमकावणारे, त्रास देणारे, द्वेष करणारे करणारे मेसेज पाठवू नका. असे करणारे WhatsApp युजर्स अडचणीत येऊ शकतात. आणि त्यांचे अकाउंट बंद होऊ शकते. म्हणूनच WhatsApp वापरतांना या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे

पॉर्न क्लिप चुकूनही शेअर करू नका

सध्या स्मार्टफोन जवळ-जवळ अनेक युजर्सकडे असल्याने युजर्स फोटो, व्हिडिओ, टेक्स्ट पाठवण्यासाठी व्हॉट्सअॅपचा वापर करतात. अशात, युजर्स कडून WhatsApp वर चुकून काही चुका होतात. असे होऊ नये याकडे लक्ष द्या. व्हॉट्सअॅपनेही आपल्या प्लॅटफॉर्मवर पॉर्न क्लिप शेअर करण्यावर बंदी घातली आहे. म्हणूच पॉर्न क्लिप चुकूनही व्हॉट्सअॅपवर शेअर करू नका. असे केल्यास हे तुम्हाला महागात पडू शकते. अनेकदा मित्राला एखादा व्हिडिओ पाठवण्याची चूक अनेक जण करतात. परंतू, व्हॉट्सअॅपवरून पॉर्न क्लिप पाठवविणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

थर्ड-पार्टी अॅप्स

GBWhatsApp पासून दूर राहा: WhatsApp Delta, GBWhatsApp आणि WhatsApp Plus सारख्या तृतीय पक्षीय WhatsApp अॅप्सचा वापर केल्याने तुमचे खाते कायमचे बंद केले जाऊ शकते कारण WhatsApp युजर्सना गोपनीयतेच्या चिंतेमुळे अशा अॅप्सवर चॅट करण्याची परवानगी देत नाही. कंपनीचा असा विश्वास आहे की, अशा थर्ड-पार्टी अॅप्सचा वापर करून युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होऊ शकतो. म्हणून WhatsApp Delta, GBWhatsApp पासून दूरच राहा. जर कोणी WhatsApp हॅक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे जेल आणि मोठा दंड आकारला जाऊ शकतो

फेक न्यूज पाठवू नका

ग्रुपमध्ये फेक न्यूज पाठवणे टाळा: फेक न्यूज पाठवू नका. कोणताही मेसेज किंवा बातमी फॉरवर्ड करण्यापूर्वी त्याची खात्री करा. नंतरच ते इतरांना पाठवा. Android स्मार्टफोनवर APK फाइल म्हणून मालवेअर पाठवू नका किंवा धोकादायक फिशिंग लिंक फॉरवर्ड करू नका. Whatsapp वर फेक अकाउंट बनवून लोकांना त्रास देऊ नका. फेक अकाउंटमुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. जर कोणी असे केले तर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करून त्या व्यक्तीला जेलची हवा खावी लागू शकते. तसेच , तुमचे खाते देखील बॅन केले जाऊ शकते.

​स्पॅमसाठी WhatsApp वापरू नका

-whatsapp-

स्पॅमसाठी WhatsApp वापरू नका: कधीही स्पॅमसाठी WhatsApp वापरू नका .WhatsApp युजर असाल तर या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. स्पॅम म्हणजे मेसेज पाठवण्यासाठी ब्रॉडकास्टिंग लिस्ट किंवा ग्रुप तयार करणे. तुम्ही जर असे करत असाल तर ते थांबवा. असे केल्यास तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकते. तुम्ही पुन्हा WhatsApp वापरू शकणार नाही. एवढेच नाही तर, जर तुम्ही बल्क मेसेजिंग, ऑटो-मेसेजिंग, ऑटो-डायलिंग इत्यादी बेकायदेशीर किंवा अयोग्य संप्रेषणात असल्याचे आढळल्यास तुमचे WhatsApp Account देखील बंद केले जाईल.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here