Mi Boost Pro

एमआयने काही दिवसांपूर्वी Mi Boost Pro नावाचा एक शानदार पॉवरबँक सादर केला होता. हा पॉवरबँक ३०००० एमएएच बॅटरी सह येतो. यामध्ये फास्ट चार्जिंगसह पॉवर डिलिव्हरी ३.० फीचर आहे. तसेच, शॉर्ट सर्किटपासून सुरक्षेसाठी १६ लेअर सर्किट प्रोटेक्शन दिले आहे. हा पॉवरबँक २४ वॉटच्या चार्जिंगने ७.५ तासात फुल चार्ज होतो. यात लिथियम पॉलिमरची बॅटरी दिली आहे. तसेच, दोन यूएसबी, एक टाइप-ए आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो. याची किंमत २,४९९ रुपये आहे.
Syska 30000 mAh Power Bank

Syska कडे देखील ३०००० mAh चा शानदार पॉवर बँक उपलब्ध आहे. हा पॉवर बँक १८ वॉट चार्जिंग सपोर्टसह येतो. तसेच, यात क्विक चार्ज ३.० टेक्नोलॉजी दिली आहे. एमआयच्या पॉवर बँकप्रमाणेच याची पॉवर डिलिव्हरी २.० आहे. या पॉवर बँकमध्ये लिथियम पॉलिमरची बॅटरी दिली आहे. चार्जिंगसाठी टाइप-सी मिळले. तसेच, यात तीन आउटपूट पोर्ट मिळतात. हा पॉवर बँक १२ लेअर प्रोटेक्शनसह येतो. याची किंमत २,२४९ रुपये आहे.
UBON PB-X33 Jumbo Powe

UBON PB-X33 Jumbo Powe पॉवर बँकमध्ये देखील ३०००० mAh ची बॅटरी दिली आहे. या पॉवर बँकमध्ये तुम्हाला थ्री इन वन चार्जिंग पोर्ट, २ USB/Type C/Micro USB/ पोर्ट मिळतील. UBON च्या या पॉवर बँकचे वैशिष्ट्ये म्हणजे तुम्ही याद्वारे आयफोनपासून ते अँड्राइडसह अन्य डिव्हाइस सहज चार्ज करू शकता. याद्वारे तुम्ही एकाचवेळी दोन डिव्हाइसला देखील चार्ज करू शकता. UBON PB-X33 Jumbo Powe ची किंमत २,१४९ रुपये आहे.
Romoss

Romoss कडे देखील ३०००० एमएएचचा पॉवर बँक आहे. यामध्ये लिथियम पॉलिमर बॅटरी दिली आहे. एकदा चार्ज केल्यावर या पॉवर बँकचा वापर तुम्ही जवळपास ७ दिवस करू शकता. यात १८ वॉट फास्ट चार्जिंगची सपोर्ट दिला आहे. तसेच, टाइप-सी, मायक्रो आणि लाइटनिंग पोर्ट देखील मिळेल. कंपनीचा दावा आहे की, या पॉवर बँकद्वारे तुम्ही आयफोन ८ ला तब्बल १२.६ वेळा फुल चार्ज करू शकतो. याची किंमत ३,२९० रुपये आहे.
Ambrane

Ambrane च्या ३०००० एमएएच पॉवर बँकला तुम्ही २,४४९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या पॉवर बँकचे वजन ५३४ ग्रॅम आहे. यामध्ये क्विक चार्ज ३.० चा सपोर्ट दिला आहे. Ambrane च्या या पॉवर बँकमध्ये एलईडी लाइटसह टाइप-सी पोर्ट आणि मायक्रो यूएसबी पोर्टचा देखील सपोर्ट मिळेल. या पॉवर बँकसोबत कंपनी चार्जिंग केबल देखील देत आहे. तुम्ही जर वारंवार प्रवास करत असाल तर अशावेळेस फोनला चार्ज करण्यासाठी हा पॉवर बँक खूपच उपयोगी येईल.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times